योध्दा प्रतिष्ठानचा पुरस्कार प्रदान सोहळा अकलुज मध्ये उत्साहात संपन्न !

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अकलुज प्रतिनिधी- छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी 19 फेब्रुवारी 2020 रोजी योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शेखरभैय्या खिलारे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक , शैक्षणिक,कला, क्रीडा,सांस्कृतिक साहित्यिक,वैद्यकीय क्षेत्रात कार्य करुन जनतेची सेवा केली अशा नागरिकांना पुरस्कार वितरण करण्यासाठी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कला-धिरज गुरव,संदिप गांधी, क्रीडा-अभिषेक बोकफोडे,साहित्य गजानन पिसे,सामाजिक युवाकार्यकर्ता अक्षय जाधव,आदर्श कार्यकर्ता साहिल आतार,आदर्श पत्रकार एम.एम शेख, दिग्दर्शक राजकुमार कांबळे,
बळीराम चव्हाण सर-शेतीनिष्ठ
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग भाऊ देशमुख,दलित महासंघाचे नेते राजाभाऊ खिलारे,सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे विकासदादा धाईंजे,शिवसेना तालुका संघटक अँड.वीरेंद्र वाघमारे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलुज शहराध्यक्ष सुरेशभाऊ गंभीर,पत्रकार निनाद पाटील,विलास गायकवाड,तुकाराम उबाळे,जेष्ठ पत्रकार हुसेन मुलानी गणेश जाधव,किरण भांगे,बच्चन साठे,धनाजी साठे या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले,तसेच पत्रकार कै. प्रसाद जोगळेकर यांना मरणोत्तर आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले,त्याच बरोबर कोरोना काळात ज्यांनी स्वतः चा जीव धोक्यात घालुन अहोरात्र जनतेचे सेवा केली अशा व्यक्तींना ही योध्दा प्रतिष्ठान संस्थेमार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.त्यावेळी बिपिन बोरावके,दत्ता साळुंके करण कांबळे प्रदीप नाईकनवरे,शौकत मुलानी, गणेश जोगळेकर,केशव लोखंडे,शिवराम गायकवाड ,तानाजी साठे व असंख्य मान्यवर उपस्थित होते.सदर पुरस्कार प्रदान सोहळा अकलुज विकास सोसायटीच्या हाँलमध्ये झाला त्यावेळी बहुसंख्येने नागरिक व महीला उपस्थित होत्या.