४ थे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृति संमेलन २६फेब्रुवारी रोजी सोलापूर येथे होणार
जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे,प्रा.भास्कर बंगाळे ,भरतकुमार मोरे,संध्या माने,फिरदोस पटेल,सुरेखाताई लांबतुरे,अर्चना खरात,यांचेसह मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- ४ थे सत्यशोधक मुक्ता साळवे साहित्य संस्कृति संमेलन २६फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील राजमहल गार्डन(इम्पोरियल पँलेस) हाँटेल क्लब जवळ ,उजनी आँफिस समोर ,दक्षिण सदर बजार येथे संपन्न होणार असल्याची माहिती सचिन बगाडे(अध्यक्ष सत्यशोधक बहुजन आघाडी यांनी पत्रकाद्वारे दिली.
या संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ साहित्यीक प्रा. डाँ.अजिज नदाफ यांचे हस्ते होणार असुन अध्यक्षस्थान हे भुषविणार आहेत. जेष्ठ साहित्यीक बा.बा.कोटंबे हे भुषविणार आहेत.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे,आ.प्रणितीताई शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे,प्रकाश वाले,नगरसेविका स्वातीताई आवळे,भारत जाधव,सुहास शिंदे, देवेंद्र भंडारे, यशवंत फडतरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
या संमेलात सामाजिक, साहित्यीक, पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे यामध्यै जोशाबा टाईम्सचे संपादक श्रीकांत कसबे,(पत्रकारिता)प्रा.भास्कर बंगाळे ,(साहित्यीक)भरतकुमार मोरे(पत्रकारिता),संध्या माने,(कला,विशेष सन्मान)फिरदोस पटेल(सामाजिक),सुरेखाताई लांबतुरे(सामाजिक),अर्चना खरात(सामाजिक), प्रा.शिवाजीराव चाळक(बालसाहित्य),डाँ.सतेज दणाणे(वैचारिक लेखन),बाळासाहेब भडकवाड(संपादन),नागनाथ गायकवाड़(कवी), प्रा. युवराज खरात(काव्यसंग्रह),विठ्ठल भंडारे,(साहित्यीक) यांचा समावेश आहे.
दुसर्या सत्रात परिसंवादाचे आयोजन केले असुन”लोकशाहीर काँम्रेड आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील शोषितांच्या संघर्षातील प्रतिबिंब” याविषयावर प्रा.डाँ.किशोर जोगदंड, डाँ.सुधाताई कांबळे, प्रा.मारुती कसाब, प्रा.बबलू गायकवाड़ हे आपले विचार व्यक्त करणार असुन अध्यक्षस्थानी काँ.तानाजी ठोंबरे हे असणार आहेत.
यानंतर प्रा.सुहास नाईक यांचे “सत्यशोधक समाजातील मातंग समाजाचे योगदान! याविषयावर विशेष व्याख्यान होणार आहे.
सायंकाळी ५ ते ७ यावेळेत कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून समन्वयक म्हणुन विनोद अष्टुळ,शंकर कसबे,देवेंद्र औटी,विकी कांबळे हे असणार असून यावेळी कवी अँड.महादेव कांबळे, टी.एस.क्षिरसागर,व्यंकट दंतेराव,डाँ.शुभा लोंढे,कांचन मुन यांचेसह अनेक मान्यवर कवी उपस्थित रहाणार आहेत.
स्वागताध्यक्ष सचिन बगाडे, सुरेश पाटोळे,सोपान खुडे,तर निमंत्रक श्रीमंत जाधव,सुधाकर पाटोळे,सतीश बगाडे,अँड.राहुल पोटफोडे याचेसह अनेक जणांचा सहभाग आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समिती स्थापन करण्यात आल्या आहेत.
या एकदिवसीय संमेलात उपस्थित रहावे असे आवहान संयोजन समितीचे सदस्य किसन पाटोळे, श्रीधर जाधव, गोविंद कांबळे , विजय अडसुळे , यतीराज कांबळे, संजय साठे,संगिता कांबळे, सौदागर क्षिरसागर, संजय रणदिवे यांचे संयोजन समितीने केली आहे.