पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी अनिल (बापू)पानपाटील यांची निवड

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
कठोरा ता.चोपडा (जि.जळगांव)- पुरोगामी संघर्ष परिषदेच्या महाराष्ट्रराज्य उपाध्यक्षपदी कठोरा(ता.चोपडा) येथील अनिल पानपाटील (बापू) यांची निवड करण्यात आली आहे. पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले.
निवडीनंतर बोलताना अनिल पानपाटील म्हणाले उत्तर महाराष्ट्रा मध्ये आदिवासी समाजा बरोबर इतरही समाजास घेऊन धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यामध्ये पुरोगामी संघर्ष परिषदेची बांधणी मजबूत करून तळागाळातील लोकांना अन्यायाच्या विरोधात खंबीरपणे स्वतःचे मत मांडण्याचे धाडस निर्माण करणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे चोपडा तालुक्यातील एका छोट्या खेडेगावातील तरुणाला पुरोगामी विचाराच्या चळवळीत राज्यस्तरावर संधी मिळाल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.