फकीरा दला कडून आद्य क्रांतिकारी गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४१ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन !


जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
अक्कलकोट:-१७फेब्रुवारी रोजी आण्णाभाऊ साठे नगर माणिक पेठ अक्कलकोट येथे फकीरा दला कडून आद्य क्रांतिकारी गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या १४१वी पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मातंग समाज अध्यक्ष निवृत्ती पारखे यांच्या शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मनसे शहर संघटक देवेंद्र शिंदे, राहुल क्षिरसागर,वंचित चे शहराध्यक्ष विशाल ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी सुरेश पारखे ,भानुदास महाराज देडे, वंचित चे शहर महासचिव भारत देडे, आरपीआय शहराध्यक्ष सुरेश सोनकांबळे,आरपीआय संघटक अंबादास शिंदे बालाजी पारखे,रवी सोनकांबळे,स्वामी कोळी, सिद्धार्थ वरवडे,छोटू जाधव, सोनू देडे,यल्लाप्पा देडे, नितीन पारखे, संजय कामनळी ,सागर देडे आदि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्योतिबा (जय भाऊ) पारखे यांनी मानले.





