शिवजयंती निमित्त भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था रमामाता महिला मंडळ व अखंड मराठी न्यूज यांचे वतिने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्थारमामाता महिला मंडळ व अखंड मराठी न्यूज यांचे वतिने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
हि स्पर्धा चार गटात होणार असुन इयत्ता पहिली ते चौथी या गटासाठी कोणत्याहि आवडीच्या विषयावर चार मिनटात बोलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.दुसरा गट इयत्ता पाचवी ते आठवी असुन या गटासाठी १)छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण,२) छत्रपती शिवाजी महाराज आणी माता जिजाऊ,३) छत्रपती शिवाजी महाराज व.स्वातंत्र्य याविषयावर पाच मिनीटात स्पर्धकाने विचार व्यक्त करायचे आहेत.तीसरा गट इयत्ता नववी ते बारावी असुन या गटासाठी १),आजच्या तरुणाई ला शिवरायांचा संदेश,२)मला समजलेले शिवराय,३)शिवराय आणी सामाजिक समता ४) धर्मनिरपेक्षवादी राजे छत्रपति हे विषय असून या गटासाठी सहा मिनीटांचा वेळ आहे. चौथा गट हा खुला असून या गटासाठी १) हिशोब स्वातंत्र्याचा मांडावा लागेल २)चला मोजू या बाईच्या कष्टाची किंमत ३) राजे तुमच्या राज्यात राज्य कोणाचे हेच कळत नाही ४)समतेचा ध्वज उंच धरारे ! हा विषय असून सात मिनीटाचा वेळ दिला असुन स्पर्धकांना गट एक साठी रु२५/-गट दोन व तिन साठी रु.५०/-तर खुल्या गटासाठी१००/-प्रवेश फी भरावी लागणार आहे.
गट एक साठी प्रथम क्रमांक रु.५००/-द्वितीय रु -३००/-तृतीय- रु१००/-उत्तेजनार्थ-१००/- बक्षिस आहे.गट दोन साठी प्रथम क्रमांक रु-७००/-द्वितीय-रु-५००/-तृतीय- रु-२००/-उत्तेजनार्थ-रु-२००/- बक्षिस आहे.गट तिन साठी प्रथम क्रमांक रु-१०००/-द्वितीय-रु-७००/-तृतीय-रु-५००/-उत्तेजनार्थ-रु-३०० बक्षिस आहे. खुल्या गटासाठी प्रथम क्रमांक रु.१५००/-द्वितीय-रु-१०००/-तृतीय-रु-७००/-उत्तेजनार्थ-रु-३००/- बक्षिस आहे
हि स्पर्धा २२फेब्रुवारी २०२२ रोजी गौतम विद्यालय पंढरपुर येथे सकाळी १०वाजता सुरु होणार आहे. बक्षीस वितरण त्याच दिवशी संध्याकाळी ७:००वाजता भीमशक्ती चौक,संतपेठ येथे होणार असुन प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह (क्रमांक १ते३ साठी) रोख रक्कम देऊन विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे..स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी २१फेब्रुवारी पर्यंत प्रा.सुरेखाताई भालेराव मो.नं.8329388442/8764008574प्रा.विद्या सर्वगोड मो.नं.9960512022 सिध्दार्थ गावकरेमो.नं.7875650411या व्हाट्सएप नंबरवर करावी.
स्पर्धकांनी एक तास अगोदर उपस्थित रहावे.स्पर्धैचे काही निर्णय ऐनवेळी बदलण्याचे हक्क आयोजन समितीने राखून ठेवले आहेत.






