फक्त सत्तेसाठी एकत्रित येऊ पाहणार्या विठ्ठल परिवारातील नेत्यांनी लोकांची थकित देणी देण्याची एकत्रित जबाबदारी स्विकारावी.– अमरजित पाटील

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर-पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी मधील नेतृत्वाचा वाद हा त्या पक्षाचा अंर्तगत वाद आहे.त्याच्याशी काॅंग्रेस पक्षाला काही देणेघेणे नाही.आगामी नगरपरिषद,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादीमधील अनेक गटाच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न होताना दिसत आहे.त्यासाठी काही बैठकांही पार पडल्याचे वृत्तपत्रातील बातम्यावरुन समजले आहे.राष्ट्रवादीमधील सत्तेसाठी एकत्रित येऊ पाहणार्या विठ्ठल परिवारातील नेत्यांनी श्री विठ्ठल सहकारी,सहकार शिरोमणी व चंद्रभागा डेअरी आदी संस्थामधील जे प्रश्न त्यांनी निर्माण करुन ठेवलेले आहेत.ज्या सभासद – कामगार व वाहतुक दारांची थकित देणी देण्यासाठी एकत्रित येऊन जबाबदारी स्विकारावी.असे आवहान अमरजित पाटील तालुकाध्यक्ष,पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटी यांनी केले आहे.
तसेच,आगामी पंढरपूर नगरपरिषद,जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीमध्ये काॅंग्रेस पक्षासमोर सर्व पर्याय खुले असले तरी अंतिम निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांशी चर्चा करुन आमची भुमिका जाहिर करणार आहोत.याबाबत लवकरच पंढरपूर तालुका व शहर काॅंग्रेसच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडणार आहे.सध्यातरी पंढरपूर तालुका काॅंग्रेस कमिटीच्या तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया सुरु असून लवकर कार्यकारिणीची पहिली यादी जाहिर करण्यात येणार आहे.असे त्यांनी जाहीर केलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.





