Uncategorized

युटोपियन शुगर्सचे बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पुजन उत्साहात संपन्न

चालू गळीत हंगामा करिता 4.00 लाख मे.टना पेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

 श्रीकांत कसबे

मंगळवेढा :- कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याच्या 2026-2027 या तेराव्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पुजन समारंभ मंगळवार दि.13/10/2026 रोजी कारखान्याचे संस्थापक चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले.

प्रारंभी कारखान्याचे पर्यावरण अधिकारी  सचिन शिंदे यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते अग्निप्रदीपन करण्यात आले.

यावेळी बोलताना संस्थापक चेअरमन  उमेश परिचारक म्हणाले की, आपल्या कारखान्याचा हा तेरावा गळीत हंगाम असून मागील बारा हंगामात युटोपियनने भरीव कामगिरी केली आहे. चालू गळीत हंगामात 4.00 लाख मे. टन ऊसाच्या गाळपाचे उद्दीष्ट असुन 1.00 कोटी लिटर इथेनॉल उत्पादित करणार असलेचा मानस व्यक्त केला. शासनाने दिनांक 15 ऑक्टोंबर, 2026 पासुन गाळप परवाना दिलेला आहे त्यामुळे चांगल्या रिकव्हरीचा ऊस मिळेल. पहिल्या दिवसापासुन कारखाना पुर्ण क्षमतेने चालवला जाईल. गत बाराही हंगामात ऊस उत्पादक हे युटोपियन कारखान्यास ऊस देण्यास प्राधान्य देतात व यापुढे हे देतील अशी खात्री आहे. तसेच सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता त्यांनी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार वर्ग यांना पाणी काटकसरीने वापरण्यासंदर्भात आवाहन केले. ऊस उत्पादकांनी चिंता न करता कारखान्याच्या शेती विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन ही परिचारक यांनी केले. कारखान्याने या वर्षी 10 हार्वेस्टर मशिन तसेच 250 ट्रॅक्टर, 150 मिनी ट्रॅक्टर याप्रमाणे करार केले आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक म्हणाले की, संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना यंत्रणा सज्ज आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कारखाना कर्मचारी यांना दिवाळी सणासाठी दरवर्षी प्रमाणे सवलतीच्या दरात साखर वाटप करणेत येईल. सर्व कामगार वर्ग हा चालू गळीत हंगाम यशस्वी करतील अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. सर्व कामगारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कामगारांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 8.33 टक्के बोनस दिला जाईल. या कार्यक्रमासाठी कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख व कामगार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close