Uncategorized

संशोधकांनी आपले संशोधन सोप्या व अर्थपूर्ण रीतीने मांडावे – प्रा..डॉ. विद्यागौरी टिळक

प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर – “संशोधन ही गंभीरपणे करण्याची बाब असून त्याविषयी असलेल्या बाळबोध संकल्पना नवीन संशोधकाच्या मनातून काढून टाकण्याचे काम मार्गदर्शकास करावे लागते. समाजजीवनातील समस्या लक्षात घेवून संशोधकांनी विषयाची निवड केली पाहिजे. भाषा आणि साहित्य यांच्या विषयी संशोधन करताना संशोधनाचे उद्दिष्ट्य, लेखकाचे व्यक्तिमत्व व कलाकृतीचा संबंध याविषयी अभ्यासकाने विशेष लक्ष दिले पाहिजे.” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भाषा व साहित्य : संशोधनाचे पद्धतीशास्त्र आणि शोधप्रबंध लेखन’ या विषयावर दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे हे होते.
डॉ. विद्यागौरी टिळक पुढे म्हणाल्या की, “नवीन संशोधकांनी संशोधन मार्गावरून वाटचाल करताना पूर्वसुरीच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करून पुढील नवीन दिशा शोधाव्यात. संशोधनाचे पद्धतीशास्त्र हे व्यापक भान आणून देणारे असते. त्यामुळे संशोधन करताना ते समजून घेतले पाहिजे. मूलभूत कौशल्याचा विकास करून लिहिता आले पाहिजे. संशोधन मांडताना ते अधिक सोपे व अर्थपूर्ण लिहिले पाहिजे.”
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे म्हणाले की, “साहित्य आणि भाषा यांचे संशोधन करताना संशोधकांनी योग्य संशोधन पद्धती निवडली पाहिजे. संशोधन क्षेत्रात विद्यापीठ पातळीवर होत असलेले प्रयत्न खूप महत्त्वाचे असून याची व्याप्ती अधिक वाढविली पाहिजे. देशाच्या सामाजिक व साहित्यिक विकासासाठी होणारे संशोधन ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.”
या कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्र.डॉ. चांगदेव कांबळे यांनी केले. या कार्यशाळेत प्रा. डॉ. सारीपुत्र तुपेरे, प्रा. डॉ. वामन जाधव, प्रा. डॉ. भारती रेवडकर, प्रा. डॉ. रविकांत शिंदे, प्रा. डॉ. सुहास पुजारी, शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रा.. डॉ. अनिल गवळी, प्रा.. डॉ. बिरा पारसे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस उपप्राचार्य डॉ. तानाजी लोखंडे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. लतिका बागल, मॉरिशसवरून प्रा.. डॉ. बिदन आबा, कुमारस्वामी महाविद्यालय औसा येथील प्राचार्य डॉ. एम.एम. बेटकर, प्रा.. डॉ. सुधाकर शेलार, प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत, प्रा.. डॉ. भाऊसाहेब गमे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती विद्यापीठ व गोवा विद्यापीठ या कार्यक्षेत्रातील संशोधक मार्गदर्शक, संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थी असे जवळपास तीनशे पन्नासहून अधिक अभ्यासकांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. राजाराम राठोड, प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रा. राजेंद्र मोरे, सुरेश मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्वांचे आभार प्रा. डॉ. दत्ता डांगे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close