Uncategorized

साहित्यरत्न लो अण्णा भाऊ साठे महामंडळास वाढीव १२०० कोटी भाग भांडवल त्वरित द्या अन्यथा तीव्र आंदोलन

साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना पत्र

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पुणे:-साहित्यरत्न लो अण्णा भाऊ साठे विकास महामंडळास भागभांडवल अत्यंत तुटपूंजे असून तसेच अनेक दिवस महामंडळ बंद अवस्थेत असल्याने मागील अनेक वर्षांचे भागभांडवल वायाच गेले आहे. या अनुषंगाने महामंडळास १२०० कोटी भागभांडवल त्वरित महामंडळाला देऊन महामंडळ ताबडतोब चालू करावे,राज्य सरकारकडून मिळणाऱ्या
भागभांडवला मधून रु 1 लाख ते ५ लाख रुपये पर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ सुरू करावी.बीजभांडवल कर्ज योजनेची मर्यादा रु 7 लाख रुपये वरून 10 पर्यंत करण्यात यावी त्या मध्ये महामंडळाचा हिस्सा 20% ऐवजी 45% इतका व बँक कर्ज 50%तसेच,लाभार्थी हिस्सा 5% असा करून तात्काळ शासन निर्णय काढून योजना पूर्ववत सुरू करावी.अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर रु 10 लाख रुपये पर्यंतची
व्याज परतावा योजना या महामंडळास तात्काळ सुरू करावी. अन्यथा महाराष्ट्र भर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे पत्र साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा प्रदेश सचिव श्री अमित गोरखे यांनी दिले आहे.


पहिल्या अधिवेशना मध्ये उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी घोषणा केलेले १०० कोटी रुपये अजूनही मंडळाला प्राप्त झाले नाहीत याची ही आठवण त्यांनी करून दिली आहे .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close