Uncategorized
श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुंडेवाडी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मुंडेवाडी येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरुवातीसप्रास्ताविक आणि स्वागत प्रशालेतील सहशिक्षक मुलाणी सर यांनी केले.त्यानंतर ध्वजारोहण प्रशालेचे मुख्याध्यापक खिलारे.बी.डी. सर यांनी केले.त्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कांबळे डि.बी. सर यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे संचलन क्रीडा विभाग प्रमुख फुगारे सर यांनी केले.शेवटी या कार्यक्रमाचे आभार बंडगर मॅडम यांनी मानले.कोरोणाच्या सर्व नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.