Uncategorized

कासेगावच्या आयसीएमएस महाविद्यालयाची निकिता भोसले विद्यापीठात द्वितीय

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज मध्ये बी.एससी.(ई.सी.एस)भाग-१ मधील कु. निकिता बंडू भोसले या विद्यार्थिनीने ८८.२५ टक्के गुण मिळवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये द्वितीय येण्याचा मान मिळवला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर कडून ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये आयसीएमएस तथा ‘इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज’ पंढरपूर, कासेगाव मधील बी.एससी.(ई.सी.एस)भाग-१ मधील कु.निकिता बंडू भोसले या विद्यार्थिनीने ८८.२५ टक्के गुण मिळवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मध्ये ‘द्वितीय क्रमांक’ मिळवला आहे . शिक्षण क्षेत्रात अल्पावधीत नावारूपाला आलेले महाविद्यालय म्हणून स्वाईप संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव, पंढरपूर ची ओळख निर्माण झाली आहे. या शिक्षण संकुलाची स्थापना २००९ साली झाली. तेव्हापासून आय.सी.एम.एस. कॉलेजने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत वाढता ठेवणारे ग्रामीण भागातील एक उत्कृष्ट कॉलेज म्हणून आय.सी.एम.एस कॉलेज, कासेगाव कडे आदराने पहिले जाते. कु.निकिता भोसले या विद्यार्थिनीला प्राचार्य डॉ. ए.एस.भोईटे, विभागप्रमुख प्रा. जे. एन. अर्जून, वर्गशिक्षक प्रा.ए.बी.रुपनर तसेच इतर सहशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष एच. एम. बागल, उपाध्यक्ष बी.डी रोंगे, संस्थापक-सचिव डॉ.बी.पी रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे, कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री भोसले तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनी कु.निकिता भोसले हिचे अभिनंदन केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close