सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पुरोगामी सेवा मंडळाने घेतले धडाकेबाज निर्णय
चेअरमन सुनील गुरव व व्हा. चेअरमन महादेव माळे यांनी दिला सभासदांना कोव्हीड काळात दिलासा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्ट
श्रीकांत कसबे
.सांगली जि. प्रतिनिधी:-दि. २७.रा.शाहू महाराज जयंतीचे
औचित्य साधत… सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पुरोगामी सेवा मंडळाने सभासदांना वारंवार दिलासा देणारे निर्णय घेतले असून या पंचवार्षिक मध्ये सलग दुसऱ्यांदा मासिक कायम ठेवी परत करण्याचा ऐतिहासिक धाडसी निर्णय घेतला असून तो सोमवार दि . २८ जून पासून लागू होणार आहे .तशी सहकारआयुक्तांची परवानगी मिळाली आहे.
तसेच पोटनियम दुरुस्तीत शेअर्स रक्कम ६% वरून ५% करण्यात आली आहे. पोटनियम सहकार आयुक्तांनी मंजूर केला आहे.
डी.सी.पी.एस धारक शिक्षक सभासद दुर्दैवाने मयत झाल्यास त्यांच्या वारसांना तीन लाखां ऐवजी पाच लाखांची मदत केली जाणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेला नोकर भरती कपात आकृतीबंध १७५ वरून कपात करून १५० केला आहे . यालाही सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रगती पथावर असणाऱ्या सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे स्थैर्य अधिक मजबूत होणार आहे.
यापूर्वी कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत आरटीजीएस, एनईएफटी , एस एम एस सुविधा, प्रत्येक शाखेत शुद्ध पेय जल योजना याबरोबरच कर्जदार सभासदांना स्टँप ड्युटी २०० रु करून हजारो सभासदांची लाखो रुपयांची बचत करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने यापूर्वीच टप्प्या टप्प्याने कर्जाचे व्याजदर कमी करून डिव्हीडंट वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.
यावेळी राज्य नेते विश्वनाथ (अण्णा ) मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड , राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्डाचे अध्यक्ष, किसनराव पाटील , सचिव शशिकांत भागवत , जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, संचालक तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, यु.टी जाधव, श्रीकांत माळी, सदाशिव पाटील, शिवाजी पवार, अर्चना खटावकर, रमेश पाटील, बाळासाहेब आडके, हरिभाऊ गावडे, राजाराम सावंत , मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोले, असि. मॅनेजर विजय नवले, असि. मॅनेजर प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.