Uncategorized
विज्ञान महाविद्यालयात राजर्षि शाहू जयंती साजरी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
सांगोला-विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांची 147 वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले होते. यावेळी मा. प्रभारी प्राचार्य यांचे हस्ते छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रा. विजयकुमार घाडगे, प्रा. मारुती हाके, प्रा. सचिन गडहिरे, आबासाहेब गावडे, निसार मुलाणी, बाळासाहेब कोळी व श्रीम. विमल माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नियोजन समितीचे चेअरमन प्रा. डॉ. दिपक रिटे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. धैर्यशील भंडारे यांनी केले.