मान्यवरांची जननी,समृद्ध वारशाच्या बनपुरीने शैक्षणीक विश्व कवेत घ्यावे . सादिक खाटीक , राजेंद्र खरात यांचे आवाहन .

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
बनपुरी दि . २९ ( प्रतिनिधी ) मान्यवरांची जननी असलेल्या समृद्ध वारशाच्या बनपुरीने शैक्षणीक विश्व कवेत घ्यावे .असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक आणि रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले आहे.
श्रेयस अल्पना दादासाहेब वाघमारे या इयत्ता ४ थी च्या वाढदिवसानिमित्त बारवकर वस्ती जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या पेन आणि खावू वाटप करण्यात आले . तसेच नवोदय विद्यालय पलुस येथे प्रवेश पात्र ठरलेल्या अफ्फान असिफ मुजावर याचा आणि हर्षल चा यावेळी सत्कार करणेत आला . यावेळी खाटीक – खरात यांनी बोलताना वरील आवाहन केले .
आटपाडी तालुक्याचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख , लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर, माजी आमदार राजेंद्र आण्णा देशमुख, ज्येष्ट नेते धोंडीसाहेब देशमुख ,सांगली जि.प. चे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख, माजी सभापती रुक्मीणीताई यमगर, माजी सभापती सौ .जयमाला देशमुख, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख , कस्टम मधील वरीष्ट अधिकारी जनार्धन धेंडे, डी .वाय .एस .पी . गजानन राजमाने, पी एस आय कै मारुती उर्फ मनोज खताळ, पी . एस . आय . सविता कदम वगैरे मान्यवर महोदयांची जननी बनपूरी असून समृद्ध वारशांच्या बनपुरीला शैक्षणीक क्षेत्राबरोबर विविध क्षेत्रात अव्वल येण्यासाठी एकजुट आणि मोठ्या ध्येय व्यासंगाची गरज आहे . पालक आणि राज्यकर्ते समाजधुरीणांनी सतत प्रयत्न केल्यास बनपुरीला शैक्षणीक विश्वात अव्वल स्थानी येणे फारसे अवघड नाही. असे सादिक खाटीक यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले .
नवोदय विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमागे शिक्षकाला रोख पन्नास हजार रुपयेचे बक्षीस देण्यास पुढे आलेल्या राजेवाडीचा आदर्श बनपुरीकरांनी अंमलात आणावा . बारवकर वस्ती शाळे बरोबरच बनपुरीच्या विकासासाठी पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू असे अभिवचनही सादिक खाटीक यांनी दिले .
सर्वसामान्य, उपेक्षित, मागास, यांच्याबरोबर समस्त भारतीयांना असंख्य अधिकार देत लोकशाही व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून देण्याचे काम डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी केले . या अधिकाराचा पुरेपूर वापर करीत प्रत्येक परिवाराने आपली समृद्धी विकास साधल्यास प्रत्येक गाव शहरे बलशाली होतील असे राजेंद्र खरात यांनी यावेळी स्पष्ट केले .
श्रेयस वाघमारे – अफ्फान मुजावर यांना शुभेच्छा देत सरपंच सौ. सुनिता महादेव पाटील यांनी बारवकर वस्ती शाळेच्या इमारत व अन्य सोयी सुविधा बाबतीत बनपूरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू असे अभिवचन दिले .
गुणवत्ता असलेल्या बारवकर वस्ती शाळेतील अनेक मुले उच्च शिक्षण घेत असल्या बद्दल आनंद व्यक्त करून जीवनदीप विद्या मंदिर कामथचे मुख्याध्यापक मच्छिंद्र पाटील सर यांनी येथील शिक्षकांच्या प्रयत्नांना धन्यवाद दिले .
सरपंच सुनिता पाटीलं, मच्छिंद्र पाटील सर ,आर पी आय चे धनंजय वाघमारे , रणजित ऐवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पुजारी, सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे उपाध्यक्ष महादेवराव पाटील,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष विशाल काटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता यमगर,पोलीस पाटील हणमंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जालींदर कटरे, माजी सरपंच राजेंद्र यमगर , बनपूरी ग्रा.पं. सदस्य दीपक देशमुख, विकास पुकळे,मजुर सोसायटी बनपुरी चे चेअरमन हणमंतराव कुराडे, संजय यमगर, शाळा व्यवस्थापन समिती बारवकर वस्ती अध्यक्ष धुळाजी ठेंगले. शाळा व्यवस्थापन समिती बारवकरवस्ती च्या उपाध्यक्षा कोमल सोन्नुर ,तसेच विकास मंडले, अनिल वाघमारे, पितांबर वाघमारे, विष्णु वाघमारे, अंकुश वायदंडे, नाथा पावणे, मंगल झोडगे, शोभाताई तोरणे , रेश्मा मुलाणी, सुनंदा धेंडे , निर्मला वाघमारे यांच्या सह बनपुरी मधील सर्व अंगणवाडी सेविका व वाघमारे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व स्वागत मुख्याध्यापक असिफ मुजावर सर यांनी केले. आयोजन दादासाहेब वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे उपशिक्षक संतोष अजेटराव यांनी केले.



