डॉ.शिवानी मलपे हिचा बी ए एम एस झाल्याबद्दल राजर्षी शाहू कॉर्नर येथे सत्कार


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल-
श्रीकांत कसबे
पंढरपूर :- राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव समितीचे सदस्य दत्तात्रय मलपे यांची कन्या डॉ. शिवानी ही बी.ए.एम.एस परीक्षेमध्ये डॉ. एन ए.मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अंकली तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव (कर्नाटक) येथून उत्तीर्ण झाले त्याबद्दल राजर्षी शाहू कॉर्नर यांचे वतीने जाधवजी जेठाभाई धर्मशाळा येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष सुनील वाघमारे हे होते तर प्रमुख उपस्थिती साप्ताहिक जोशाबा टाइम्सचे यांचे संपादक श्रीकांत कसबे हे होते.


यावेळी शाहू कॉर्नर चे अध्यक्ष अनिल पालसांडे,सुनील वाघमारे, श्रीकांत कसबे यांच्या हस्ते डॉ. शिवानी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तिचे वडील दत्तात्रय मलपे उपस्थित होते.
यावेळी सेवागिरी गोसावी,अशोक मागाडे सर,श्रीकांत कसबे व सुनील वाघमारे यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सोनबा वाघमारे यांनी केले. यावेळी सर्वांचे आभार सत्कारमूर्ती डॉ. शिवानी मलपे यांनी मानले.
यावेळी साहेबराव चंदनशिवे सर,शंकर रणदिवे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .



