अ.भा.भारतीय सफाई मजदूर काँगेस ने जाहिर केलेले काम बंद आंदोलन स्थगित
मुख्याधिकारी सोबत सकारात्मक चर्चेतुन निघाला तोडगा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस यांच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेतील कर्मचार्यांच्या विविध मागण्या बाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे दिनांक 27 ऑक्टोंबर 2021रोजी होणारे काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले
पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय अरविंद माळी साहेब यांनी माजी उपनगराध्यक्ष माननीय नागेश भोसले , नगरपालिकेचे पक्षनेते गुरुदास अभयंकर यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या काम बंद आंदोलनाबाबत शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष नागनाथ गडवालकर, प्रदेश सचिव बाली मंण्डेपू ,तालुका अध्यक्ष गुरू दोडिया, सचिव महेश गोयल यांच्या समवेत चर्चा केली सदर चर्चेदरम्यान येत्या दोन दिवसात दोन महिन्याचे वेतन व सेवानिवृत्ती वेतन जमा करण्या चा निर्णय झाला ,दिवाळी ऍडव्हान्स देण्याचाही निर्णय झाला ,सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतनाच्या फरकाचा एक हप्ता देण्याचा निर्णय झाला,महागाई भत्यांचा पाच महिन्याचा फरक देण्याचा निर्णय झाला, फेब्रुवारी 2020 पर्यंतचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या थकित रक्कम देण्याचा निर्णय झाला ,जे कर्मचारी सेवानिवृत्त मयत झालेत अशा कर्मचाऱ्यांच्या वारसांना येत्या होणाऱ्या जनरल सभेपुढे विषय घेण्याचा निर्णय झाला ,शैक्षणिक अहर्ता नुसार सफाई कामगारांना काम देण्याच्या बाबत सकारात्मकता दाखवली ,कोरोना काळामध्ये काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली,.
नगरपालिकेतील मैला सफाई कर्मचारी यांचे राहते निवासस्थानाची जागा मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर यांनी दिनांक 15/11/2014 रोजी जनहित याचिका क्रमांक 8/12 मध्ये उच्च न्यायालय मुंबई येथे दिलेल्या प्रतिज्ञा पत्रानुसार सदर जागा कायमस्वरूपी द्यावी ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजने अंर्तगत सफाई कर्मचारी यांना मोफत घरे बांधून द्यावीत,सफाई कामगारांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ त्वरित मिळावा, शासन निर्णय 21/5/ 2020 नुसार कोरोना महामारी मध्ये नगरपालिकेतील कर्मचारी कै .पोपट जाधव व औदुंबर देशपांडे हे मृत्यू झाले असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपये मिळावे ,शासन निर्णय नुसार सेवेत असताना दहा वर्षे सेवा होण्यापूर्वी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांरी त्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख सानुग्रह अनुदान मिळावे ,कोरोना बाधित कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना शासन निर्णयानुसार वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्चाचे बिल मिळावे ,कर्मचाऱ्यांचे वेतन पत्रक सुधारित करून मिळावे ,बँकेकडून कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळेवर जमा करावा ,शासन निर्णयानुसार प्रलंबित साठ वारस प्रकरणा बाबत अंमलबजावणी करावी,कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्विस बुक ची प्रत मिळावी, सन 2005 नंतर सेवेत समाविष्ट झालेल्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळावी,शासन निर्णयानुसार कर्मचारी र्यांच्या अडी-अडचणी बाबत प्रत्येक तीन महिन्यात बैठक घ्यावी ,मागासवर्गीय कक्ष स्थापन करावा,कर्मचाऱ्यांना ऋतुमानानुसार गणवेश मिळावा संघटनेला कार्यालयासाठी आपल्या इमारतीमध्ये जागा मिळावी ,संघटनेच्या विनंती नूसार पंढरपूर नगरपरिषद सर्वसाधारण सभेने मान्यला दिल्यानुसार कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा पॉलिसी लागू करावी या सर्व विषयावर ती सकारात्मक चर्चा झाल्यामुळे मुळे सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी शरद धनवजीर सतीश सोलंकी अनिल गोयल ,राजन गोयल ,धर्मा पाटोळे, आकाश बनसोडे ,रवि वाघेला ,कांतीलाल मेहडा अंबादास गोयल उपस्थित होते पंढरपूर नगरपालिकेने वेळीच मागण्याची निर्णय व सकारात्मक चर्चा केल्यामुळे आमदार प्रशांतराव परिचारक ,.नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले, .मुख्यधिकारी अरविंद माळी साहेब , उपनगराध्य श्वेताताई डोंबे, उपसभापती विक्रम शिरसट, पक्ष नेते गुरुदास अभ्यंकर ,अनिल अभंगराव सर, पंढरपूर नगरपालिकेतील सर्व सभापती विरोधी पक्षनेते सर्व नगरसेवक यांचे तालुकाध्यक्ष गुरू दोडिया यांनी आभार मानले