Uncategorized

आ.राजू खरे यांनी  मोहोळ मतदारसंघाच्या प्रश्नांना वाचा फोडली!

 

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर:- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ . राजू खरे यांनी आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे.

या अधिवेशनात आ.खरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या कामांची मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली मागणी अधोरेखित केली. “रस्ता म्हणजे विकासाचा कणा” हे लक्षात ठेवत मतदारसंघातील अनेक रस्ते विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता विधानसभेमध्ये मांडण्यात आली. त्यासाठी लागणारा निधी पुरवण्याची विनंती अध्यक्षकडे केली आहे.

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरही मी तळमळीने आवाज उठवला. शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी पासून दिलासा मिळावा यासाठी  आर्थिक सहाय्याची गरज अधोरेखित करत सरकारचे लक्ष वेधले.

मोहोळमध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नवीन प्रशस्त रुग्णालयाच्या विषयावरही विधानसभेचे लक्ष वेधून घेण्यात आले. नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी आवश्यक तरतुदी कराव्यात तसेच सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी ठोस विनंतीही करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close