ज्येष्ठ कार्यकर्ते कुमार ढवळे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार जाहीर


जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे
पंढरपूर :- मोहोळ येथील फुले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णा उर्फ कुमार ढवळे यांना मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सदर पुरस्कार राष्ट्रीय सन्मान सोहळा २०२५ या कार्यक्रम अंतर्गत दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे बुधवार दि.१०/१२/२०२५ रोजी ११-०० ते सांय, ६-०० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे आहे.
मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांनी कुमार ढवळे यांना निवडीचे पत्र दिले आहे.
कुमार ढवळे हे दलित पॅंथर चे क्रियाशील कार्यकर्ते असून महसूल विभागात त्यांनी 35 वर्षे ती केली असून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. रिपब्लिकन कर्मचारी संघटनेत ही त्यांनी काम केले आहे. सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते नामदार रामदासजी आठवलेचे ते खंदे समर्थक आहेत.




