राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विद्या विकास प्रशाला टाकळी येथे शालेय पुस्तक वितरण
साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे व सेवागिरी गोसावी, नानासाहेब लोखंडे यांचे हस्ते 10वी चे विध्यार्थ्यांना पुस्तक वितरण करण्यात आले.

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
-श्रीकांत कसबे

प्रबुद्ध परिवाराचे मार्गदर्शक सुनील वाघमारे व मुख्याध्यापक बिभीषण साळुंखे यांचे हस्ते 9 वी चे विध्यार्थ्यांना पुस्तकं वाटप
पंढरपूर :- राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान टाकळी चे वतीने
विद्या विकास प्रशाला टाकळी(ल ) येथील इयत्ता 9वी इयत्ता 10वी चे गरजू विध्यार्थ्यांना प्रबुद्ध परिवाराचे नेते सुनील वाघमारे व जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, ग्रुपचे सदस्य सेवागिरी गोसावी यांचे हस्ते शालेय पुस्तके वितरित करण्यात आली. प्रशालेच्या वतीने मान्यवराचा व प्रतिष्ठान चे अध्यक्ष नानासाहे लोखंडे, लहुजी सैनिक दल अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

राजर्षी शाहू महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी सरपंच .संजय साठे उपसरपंच महादेव पवार ग्रामपंचायत सदस्य सागर कारंडे , औदुंबर ढोणे,गोवर्धन देठे,देवकते, आबासाहेब पवार,नानासाहेब लोखंडे रवीवाघमारे सोमा सहदेव वाघमारे,शिवाजी चंदनशिवे,गणेश चंदनशिवे,सदाशिव नवगिरे,प्रवीण वाघमारे,राम बाळू वाघमारे,संतोष साठे , सुदर्शन साठे, शिवाजी नवगीरे, लखन वाघमारे,सहदेव वाघमारे,दत्ता वाघमारे, दयानंद साठे,तुकाराम वाघमारे,समाधान वाघमारे,इतर कार्य कर्ते
यावेळी मुख्याध्यापक बिभीषण साळुंखे, अध्यक्ष विलास देठे, सुनील वाघमारे, श्रीकांत कसबे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले.तर प्रास्ताविक विलास देठे यांनी केले. यावेळी बी. वाय.देठे,सर आर. डी.देठे,सर सागर वाघमारेसर ,रसूल मुलाणी,सर
आदी उपस्थित होते.




