सोलापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेचे छत्रपती संभाजीराजेना अभिवादन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:-(खर्डी)दि.१४ मे सोलापूर जिल्हा पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आज छत्रपती संभाजीराजे यांची जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले .खर्डी (ता. पंढरपूर) येथील भगवा चौकात पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील रणदिवे यांनी संभाजीराजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी बोलताना सुनील रणदिवे म्हणाले वयाच्या नवव्या वर्षी वडीलांच्या बरोबर आग्र्याला जाऊन तेथील राजकारण आणि शिवरायांचा बाणेदारपणा, निर्भीडपणा हे बाळकडू त्यांना लहान वयातच मिळाले आणि जीवघेण्या नजरकैदेतून निसटल्यावर मोठ्या संकटांना कसं सामोरं जायचं याचे प्रत्यक्ष अनुभव संभाजीराजांना लहान वयातच मिळाल्यामुळे धाडस हे गुण त्यांच्या अंगी आले होते.
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महेश फाळके शिवम यादव प्रशांत कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
( कोरोना चे नियम पाळून जयंती साजरी करण्यात आली)