Uncategorized

पंढरपूर पोटनिवडणूक फेर मतमोजणीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर उमेदवाराची मागणी

स्वेरीचे ते साँफ्टवेअर संशयाच्या भोवऱ्यात

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर:- पंढरपूर पोटनिवडणूकीचा निकाल २ मे रोजी जाहीर होऊन भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी घोषित करण्यात आले. ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याने आपणास कमी मतदान दाखविले आहे.प्रत्यक्षात मतदान झाले आहे पण मशीन मध्ये दिसत नाही तेव्हा व्हीव्हीपँट सह फेरमतमोजणी घेतली पाहिजे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार शैलाताई गोडसे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. त्यांचे सोबत राष्टवादीचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते रणजित बागल हे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी पक्षपातीपणा केला असुन त्याबाबत ही वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे सांगीतले.
नायब तहसीलदार पि.के.कोळी यांनी बोलविल्यावरुन सुनील मोरे व अनंत नाईकनवरे हे उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून २३एप्रिल रोजी गेले असता त्यांना गोडाऊन नंबर41Cपुढील उजव्या बाजुला कट्ट्यावर हार्डवेअर सद्रुष्य VVpatची बँटरी२५२/५८असा उल्लेख असलेले फाटलेले पांढरे पाकीट आढळले याबाबत तक्रार केली असता त्यांना टाळाटाळ करण्यात आली. शेवटी त्या वस्तू ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. यामध्ये फिर्यादीलाच पंच केले.सरकारी कर्मचारी पंच करायला पाहिजे होते.पुढे याचा काय तपास लावला ते अद्याप समजले नसल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
स्वेरीने बनविलेल्या साँफ्टवेअरने मतपेट्या बाबत यावेळी हरकत घेण्यात आली.स्वेरीचे संस्थापक, सचिव प्राचार्य बि पी.रोंगे सर हे भाजपच्या एका विंगचे जिल्हाध्यक्ष असुन ते भाजपचे संभाव्य इच्छुक उमेदवार होते.त्यांचे संस्थेत भाजपतचे अनेक पदधिकारी निवडणूक काळात उपस्थित होते.असे असताना स्वेरीचे साँफ्टवेअर वापरण्यास गजानन गुरव यांनी परवानगी देण्याचे कारण काय?हे साँफ्टवेअर वापरणार असल्याची कल्पना इतर उमेदवारांना का दिली नाही.? वरीष्ठ अधिकार्याची परवानगी घेतली होती का?असे प्रश्न निर्माण करुन सदर साँफ्टवेअर बाबत संशय व्यक्त करण्यात आला.
लवकरात लवकर फेरमतमोजणी करावी असी मागणी करुन वरील प्रकाराबद्दल वरीष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close