स्वेरीत ‘इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईटस अँन्ड पेटंट फायलिंग’ वर एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
छायाचित्र- डॉ. पद्माकर केळकर, डॉ.एन.बी. पासलकर, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे व स्वेरी चिन्ह.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर– गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विभाग आणि इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेल (आयक्यूएसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटेलेक्च्यूअल प्रॉपर्टी राईटस अँन्ड पेटंट फायलिंग’ या विषयावर स्वेरीत एक दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली.
प्रारंभी प्रास्तविकात विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांनी कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांची ओळख करून देऊन या कार्यशाळेविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा बोर्डाचे माजी सदस्य व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे माजी संचालक
डॉ.एन.बी. पासलकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ब्राईट स्टार इलेक्ट्रॉनिक्स पुणेचे संचालक डॉ. पद्माकर केळकर म्हणाले की, ‘एखादे पेटेंट फाईल करताना त्याचा आपण वेगवेगळ्या दृष्टीने विचार करायला हवा. तुमच्या आयडिया इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी मध्ये कन्व्हर्ट करुन मेक इन इंडिया च्या माध्यमातून देशाची प्रगती कशी साधता येईल हे प
पाहिले पाहिजे.’ असे सांगून बहुमोल मार्गदर्शन केले. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. पासलकर म्हणाले की, ‘स्वेरी ही शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी सातत्याने आघाडीवर असते. त्याचाच एक भाग म्हणून आयोजिलेल्या या कार्यशाळेतून सर्वांना पेटंट फायलिंग बद्दल माहिती देण्यात आली. या कार्यशाळेच्या माध्यमातून सर्वांनी कमीत कमी एक तरी पेटंट फाईल करण्याचा प्रयत्न करावा.’ स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी भारत व चीन यांच्यामध्ये पेटंट फायलिंग मध्ये असणारी तफावत तसेच ही तफावत दूर करण्यासाठी कशी पावले उचलावी? यावर विचार व्यक्त केले. संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे यांनी स्वेरीच्या वाटचाली संबंधी माहिती सांगून स्वेरीतील उपक्रमांबद्दल माहिती दिली. शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी कॉपीराइट वा ट्रेडमार्क म्हणजे काय ? हे सांगून कोणत्या गोष्टीचे पेटंट करता येते व कोणत्या गोष्टीचे करता येत नाही यावर सखोल मार्गदर्शन केले. प्लेसमेंट चे अधिष्ठाता प्रा. आशिष जाधव यांनी पेटंट फाईल करताना लागणाऱ्या पायाभूत गोष्टी तसेच पेटंट फाईल करतानाची कार्यपद्धती याबद्दल सविस्तर माहिती दिली. समारोप समारंभाचे अध्यक्ष डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी पेटंट फाईल करणे ही गोष्ट किती सोपी आहे हे उदाहरण देऊन सांगितले. या कार्यशाळेत विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २५० संशोधक प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. ए.ए. टेकळे यांनी काम पहिले. सुत्रसंचालन प्रा. डी.डी. डफळे यांनी केले तर प्रा. एम. एस. येड्रामी यांनी आभार मानले.