Uncategorized

संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’ मधील बालकांना फलाहाराचे वाटप

पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपुर:-संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’ मधील बालकांना फलाहाराचे वाटप ; पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर (प्रतिनिधी):- संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘पालवी’ या संस्थेतील बालकांना फलाहाराचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीरआबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी युवकचे पंढरपूर कार्याध्यक्ष विशाल सावंत यांनी आज दि. 30 जुन 2021 रोजी संसदरत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन इतर अनाठाई खर्चाला फाटा देत समाजोपयोगी उपक्रम राबवले.

‘पालवी’ या एडसग्रस्त बालकांच्या संस्थेतील बालकांना पोषक आहार तसेच विविध फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीरआबा भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष स्वप्नील जगताप, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शिवदास (बापु) बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी युवकचे पंढरपूर कार्याध्यक्ष विशाल सावंत, राष्ट्रवादी महिला किसान सेलच्या जिल्हाध्यक्षा सौ.शुभांगी जाधव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रथमेश (भैया) पाटील, सचिन आदमिले, शिवराज ननवरे, मंगेश जाधव, अ‍ॅड.शाम पवार, सारंग महामुनी, राकेश साळुंखे, धीरज टिकोरे, नवनाथ मोरे, स्वप्नील हत्तीगोटे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा अवलंब करण्यात आला होता. अशी माहिती राष्ट्रवादी युवकचे पंढरपूर शहराध्यक्ष स्वप्नील जगताप यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close