कामगार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नूतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा आ. प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर-पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना चे वतीने अभ्यासू व कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांची उपायुक्त न. पा .प्रशासन संचालनालय वरळी मुंबई येथे पदोन्नती ने बदली झाली त्यानिमित्ताने निरोप समारंभ व पंढरपूर नगरपरिषद चे नूतन मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा स्वागत समारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते नगराध्यक्ष सौ साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली उपनगराध्यक्ष सौ श्वेताताई निलराज डोंबे, पक्षनेते अनिल अभंगराव , गुरुदास अभ्यंकर,माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,वामन बंदपट्टे, विक्रम शिरसट,संजय निंबाळकर, राजू सर्वगोड, विवेक परदेशी, इब्राहिम बोहरी, विजय वरपे, माजी नगरसेवक नीलराज डोंबे, कृष्णा वाघमारे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट बसवेश्वर देवमारे, तम्मा घोडके, अमोल डोके यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, विवेक परदेशी ,अनिल अभंगराव, रवींद्र वाघमारे, अभिलाशा नेरे, यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे उपाध्यक्ष संतोष सर्वगोड ,जयंत पवार ,किशोर खिलारे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल वाळुजकर स्वागत महादेव आदापुरे व आभार शरद वाघमारे यांनी मानले