स्वेरीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व आश्रे चॅप्टर, पुणे यांच्यातर्फे शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग व अमेरिकन सोसायटी ऑफ हिटिंग रिफ्रिजरेशन अँड एअर काँडिशनिंग इंजिनिअर्स, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ जून ते १९ जून २०२१ या कालावधीत ‘इमर्जिंग ट्रेंडस इन थर्मल इंजिनिअरिंग’ या विषयावर मोफत ऑनलाइन ‘शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम’ संपन्न झाला.
जगभरातील तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहानुसार आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग देखील अद्ययावत असणे अत्यंत गरजेचे आहे. येत्या दशकामध्ये थर्मल इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रगतीसाठी, त्यामधील संशोधन व उपलब्ध संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन केले होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभर चाललेल्या या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. संदीप वांगीकर म्हणाले की, ‘सदरील कार्यशाळा ही अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना अतिशय उपयुक्त ठरणार असून भविष्यात याचा फायदा होणार आहे.’ या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध राज्यातील नामवंत व्यक्तींनी मार्गदर्शन केले. यामध्ये सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथील डॉ. ए. बी. कणसे-पाटील हे की-नोट स्पीकर म्हणून लाभले. त्यांनी ‘थर्मल इंजिनिअरिंग मधील संशोधन संधी’ यावर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील डॉ.सुहास देशमुख यांनी ‘थर्मल इंजिनीअरिंग क्षेत्रातील मॅटलॅब’ चे महत्व यावर, एस.वी. एन. आय. टी (सुरत,गुजरात) येथील डॉ. कमलेश सोरटे यांनी ‘बायो डिझेल’ व एमआयटी, पुणे येथील प्रा. आनंद नडगिरी यांनी ‘सोलार डीसालिनाटेशन’ यावर, स्वेरीज कॉलेज, पंढरपूर येथील प्रा. सुभाष जाधव यांनी ‘आयसी इंजिन व इलेक्ट्रिकल व्हेईकल’ या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले तर प्रा. एस. जी. पवार यांनी ‘हिट ट्रान्स्फर इन् आय. सी. इंजिन’ या विषयावर,एन.आय.टी (सिल्चर, आसाम) मधील डॉ. राहुलदेव मिश्रा यांनी ‘बॉईलींग हीट ट्रान्सफर’ या विषयावर तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथील डॉ. सुहास देशमुख यांनी ‘सीएफडी फ्ल्यूयंट’ या विषयावर मार्गदर्शन केले, एन.आय.टी. (सिल्चर, आसाम) च्या डॉ. सुकुमार पती यांनी ‘मायक्रो स्केल ट्रान्सपोर्ट फिनोमेनन’ या विषयावर व राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, इस्लामपूर येथील डॉ. एस. डी. पाटील यांनी ‘रिसर्च अपॉर्च्युनिटी इन मेटल हायब्रीड सिस्टीम फॉर हायड्रोजन स्टोरेज’ या विषयावर मार्गदर्शन केले. अखेरच्या दिवशी के. एम. बी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज (ओरिसा) येथील प्राचार्य डॉ. बी. पी. पटनाईक यांनी ‘बायो एनर्जी फॉर सस्टेनेबल एन्व्हायरनमेंट’ या विषयावर तर डॉ. अमोल उबाळे यांनी ‘हिट पाईप हिट ट्रानस्फर’ विषयावर मार्गदर्शन केले. तब्बल आठवडाभर चाललेल्या प्रोग्राममध्ये देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक व औद्योगिक क्षेत्रातील संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले होते. सदर कार्यशाळा ही प्रत्येक दिवशी चार तास गुगल मीट ॲप द्वारे ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येत होती. या वेळी शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम साठी सहभागी झालेले प्रा. वेंकटेश कुलकर्णी (व्ही. टी यू. बेळगाव), म्हणाले की, ‘स्वेरी कॉलेज बदलत्या तंत्रज्ञानाच्या प्रवाहानुसार काम करण्यास नेहमीच अग्रेसर असते. मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागांमध्ये आयोजित केलेल्या या शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम सहभागी असलेल्या सर्व प्राध्यापकांना भविष्यात नक्कीच उपयुक्त ठरेल. प्रा. नामदेव राशिंकर (एमआयटी, आळंदी), दिव्येश उबाळे (असिस्टंट इन्स्पेक्टर, आर. टी. ओ विभाग) इत्यादींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ऑनलाईन कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रोग्रामचे निमंत्रक व मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. प्रवीण ढवळे, आश्रे पुणे चॅप्टरचे स्वेरी महाविद्यालयातील प्रमुख प्रा. दिग्विजय रोंगे, प्रा. सचिन काळे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा. विक्रम चव्हाण, प्रा. कुलदीप पुकाळे, प्रा. शशिकांत जाधव व प्रा.मिलिंद कुलकर्णी आदींनी समन्वयक म्हणून तर बालाजी सुरवसे व दत्तात्रय गायकवाड यांनी तांत्रिक व्यवस्थापनाचे काम पहिले. यावेळी विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


