सादिक खाटीक यांना आमदार करण्यासाठी जयंतरावांना साकडे घालणार -सुशांत देवकर व आनंदरावबापु पाटील यांचे उदगार !
बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मिळ्याल्याबद्दल "सादीक खाटीक" यांचा सत्कार समारंभात व्यक्त केल्या भावना

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
आटपाडी दि . २६ ( प्रतिनिधी )सादिक खाटीक यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून संधी दिली जावी अथवा राज्यातल्या उपेक्षितांना न्याय देता येईल अशा ताकदीच्या महामंडळावर संधी दिली म्हणून मंत्री जयंतराव पाटील यांना आम्ही साकडे घालणार असल्याचे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर आणि मतदार संघाचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील यांनी काढले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक यांना ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेंडस सर्कल या पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पत्रकारीता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा फेटा बांधुन शाल – पुष्पगुच्छ देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव बापू पाटील, सुशांत देवकर यांचे हस्ते सत्कार करणेत आला . त्यावेळी या मान्यवर द्वयांनी वरील उदगार काढले .
भिंगेवाडी जवळील माणगंगा फळबाग संघाच्या कृषी विद्यालय आटपाडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .
दुष्काळात होरपळणारी सामान्य – शेतकरी माणसं , आपला भाग , त्यांचे प्रश्न, दुःख, दारीद्र, व्यथा – वेदना स्वतःच्या समजून आपल्या लक्षवेधी पत्रकारीतेच्या माध्यमातून सादिक खाटीक यांनी मोठ्या उंचीचे काम केले असल्याचा उल्लेख करून सुशांत देवकर – आनंदरावबापु पाटील यांनी, अतिशय खडतर स्थितीत, निःस्पृह वृत्ती व प्रामाणीकपणे जयंतराव पाटील यांचे नेतृत्व प्रमाण मानून गेली ३५ वर्षे सादिक खाटीक काम करीत आले आहेत . त्यांच्या निधर्मी वृत्तीची,निरागसतेची, निष्कलंक वाटचालीची आणि पत्रकारीतेची दखल लाखो लोकांच्या साक्षीने दै . सामनाचे संपादक , राष्ट्रीय विचारवंत नेते, खासदार संजय राऊत साहेब, एबीपी न्यूज मराठी चॅनेल मुंबईचे संपादक राजीव खांडेकर साहेब यांच्या सारखी दिग्गज माणसे घेताहेत हेच सादिक भाईंच्या कार्यकर्तृत्वाची उंची आणि दर्जा स्पष्ट करते , असे बोलून दाखविले .
जयंतराव पाटील हेच आपला पक्ष, हाच आपला नेता, हाच आपल्या ध्यास, अर्थात सबकुछ जयंतराव असे मानून निष्ठेने काम करणाऱ्या सादिक खाटीक यांच्या सात्वीक – भाबड्या भावने सारखीच आमची ही अंतरीची भावना आहे, कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता आमची आम्ही जयंत सैनिक अशीच वाटचाल राहणार आहे.जयंत मंत्रच आमच्यासाठीही वंदनीय , प्रार्थनिय आणि पुजनीय असल्याचा प्रांजळ निर्वाळा सुशांत देवकर – आनंदराव बापू पाटील यांनी आपल्या भाषणात दिला .
मतदार संघात सदाशिवरावभाऊ पाटील, जिल्हयात – राज्यात जयंतराव पाटील साहेब आणि देशपातळीवर शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदर्श समोर ठेवून खानापूर – आटपाडी मतदारसंघ राष्ट्रवादीमय करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत . जयंतराव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे सांगली जिल्ह्यातले १० आमदार राज्याच्या विधीमंडळात कसे जातील असा आपणा सर्वांचा ध्यास असला पाहीजे . पंतप्रधानपदी शरदचंद्रजी पवार साहेब आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी जयंतराव पाटील साहेब विराजमान झाले पाहीजेत हेच आपणा सर्वांचे स्वप्न असले पाहीजे असा आशावादही सुशांत देवकर – आनंदरावबापु पाटील यांनी शेवटी व्यक्त केला .
श्री . सिद्धनाथ नगरी खरसुंडीतून पत्रकारीतेची प्रेरणा आणि उर्मी मिळाल्याचा संदर्भ स्पष्ट करीत सादिक खाटीक यांनी निधर्मी वृतीने भाग आणि भागातील माणसं ,शेतकरी, कष्टकऱ्यांना वाचत, अनुभवतच सर्वासाठीच पत्रकारीता केली . पत्रकारीतेची कसलीही नशा डोक्यात न जावू देता जमीनीवर राहून राज्याचे लक्ष वेधणारे काम केले . कृषी, समाजकारण, साहित्य, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करताना हळव्या मनाच्या गाभाऱ्यातून व्यथा वेदनांवर समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला . सर्वांचेच जीवन असणाऱ्या पाण्यासाठी मोठे योगदान दिले . जयंत मंत्राला समोर ठेवून ३५ वर्षात फक्त अन् इन्सानियत जागती ठेवण्याचे काम केले . वडिल – आई – भावंडानी दिलेल्या प्रेमाच्या ,आशिर्वादाच्या तोलामोलाचा हा सत्कार उर्वरीत आयुष्यात प्रेरकच ठरेल . अशा भावना सादिक खाटीक यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या .
१९९२ साली सासनांच्या दिवशी श्री सिद्धनाथांवर सादिक भाईंनी लिहीलेल्या लेखाने मला थक्क केले . एक मुस्लीम, खरसुंडीच्या रोडलगत उघड्यावर मटन विकत बसणारा खाटीक अंतःकरणाला स्पर्शणारं इतकं चांगलं लिहू शकतो हे अचंबित करणारे होते त्यांचा जीवन प्रवास थक्क करणाराच आहे . त्यांच्या कार्य कर्तृत्वाला साजेलसा बहुमान आपल्या नेत्यांकडून ,पक्षाकडून होण्यासाठी आनंदरावबापू, सुशांतजीनी प्रयत्न करावेत अशा भावना राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजयराव पुजारी यांनी स्वागत प्रास्तावीक करताना व्यक्त केल्या .
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ यमगर, तालुका उपाध्यक्ष शशिकांत भोसले,महिला राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षा सौ.अश्विनीताई अष्टेकर – कासार, जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ . सुजाताताई टिंगरे, राष्ट्रवादी युवक चे जिल्हा उपाध्यक्ष अमित ऐवळे, प्रा . योगेश सरगर इत्यादींची सादिक खाटीक यांच्या जीवन प्रवासाचा गौरव करणारी त्यांना भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देणारी भाषणे झाली .
यावेळी कृषी विद्यालयाचे प्राचार्य विशाल यादव, राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, नेलकरंजीचे किशोर पाटील, डॉ. सदाशिव वाघमारे, सुहास पाटील,बाबुराव भोरे हे मान्यवर उपस्थित होते . शेवटी प्रा . योगेश सरगर यांनी आभार मानले .


