Uncategorized

भक्ती सागर 65 एकर येथील जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

– श्रीकांत कसबे

पंढरपूर :-आषाढी यात्रा कालावधीत विविध पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात दिंड्या येत असतात. दिंड्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांची मुक्कामाची व्यवस्था 65 एकर भक्ती सागर येथे करण्यात येते.

या ठिकाणी दिंड्यांसाठी 668 प्लॉटची उपलब्धता प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून स्वच्छ पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, आरोग्य सुविधा, विद्युत व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन कक्ष , स्वच्छता आधी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात या सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी आज केली.

यावेळी भक्ती सागर (65 एकर) येथे ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साठण्याची शक्यता आहे.त्या ठिकाणी तात्काळ मुरमीकरण करून पाण्याचा निचरा करावा. मुक्कामी असणाऱ्या दिंड्यांना कोणतेही अडचण येणार नाही या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close