Uncategorized

मातंग समाजावर होणारे अन्याय, अत्याचार हल्ले विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार…

माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी सोलापूर शहर मातंग समाज समितीच्या बैठकीत व्यक्त केल्या तिव्र भावना....

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सोलापूर दि 27
महाराष्ट्रातील मातंग समाजावर अन्याय, अत्याचार, अमानुष हल्ले याचं प्रमाण वाढले असून मातंग समाज असुरक्षित झाला आहे. समाजावर होणारे हल्ले थांबले नाही तर उग्र असे आंदोलन करून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल अश्या तीव्र भावना माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी सोलापूर शहर मातंग समाज समितीच्या बैठकीत व्यक्त केल्या.
मातंग समाजावर सोलापूर जिल्ह्यात एकरुख, येते समाजकंटका कडून सार्वजनिक रस्त्यावर जायचं नाही म्हणून जातीवाचक शिव्या देऊन मारहाण केली आहे. मंद्रूप येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेहून तिच्यावर अत्याचार केला आहे. 354,376असे गुन्हे दाखल असून पोलीस अधिकारी तपासात आणि गुन्हा नोंदवून घेण्यात हस्तपक्षेप करत आहेत. तसेच पंढरपूर तालुक्यातील पुळूज येते गावगुंडाने शासनाने राहायला दिलेली भूमीहीन जमीन अमानुष मारहाण करून हडप केली आहे.या प्रकरणासंबधी गुन्हे दाखल असून आरोपी अद्यापही मोकाट आहेत.
उत्तर सोलापूर येतील एकरुख गावात ऍट्रॉसिटी केस चा तपासाला गेलेले पोलीस अधिकारी चौकशी साठी म्हणून ताब्यात घेऊन फिर्यादीवरच खोटा गुन्हा दाखल करून अटक केली असल्याची तक्रार सोलापूर मातंग समाज बैठकित अन्यायग्रस्तानी केली.
याबरोबरच जनतेचे रक्षणासाठी ठेवलेल्या पोलिसानीच टेंभूर्णी येथे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यानी अमानवी कृत्य करतमातंग समाजातील महिलांना व पुरुषांना मानवी विष्ठा उचलायला लावली याबाबत पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नाही.
या बैठकीचे आयोजन माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या अध्यक्षेतेखाली शासकीय विश्रामग्रह येते रविवारी दुपारी करण्यात आलं होतं.सोलापूर शहर व जिल्ह्यातील मातंग समाज बांधवानी या बैठकीत तीव्र भावना व्यक्त केल्या या समाजकंटकावर कठोर कारवाई जो पर्यंत होत नाही तो पर्यंत आक्रोश मोर्चा, चक्री उपोषण, उग्र आंदोलन करून झोपलेल्या सरकारला तसेच पोलीस प्रशासनाला डोळे उघडायला भाग पाडणार असल्याचा सूर या बैठकीतून व्यक्त होता.
या बैठकीला सोलापूर शहर मातंग समाज अध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष महादेव भोसले, हिरा अडगळे, मल्लिकार्जुन कांबळे, खंडू बनसोडे, कायदेशीर सल्लागार शैलेश पोटफोडे,अनिल उकरंडे, रजनी डोलारे, लखन गायकवाड, वसंत देडे, आशिषतोष खंदारे,अमर पवार बोराडे, अनिल बनसोडे,शाम उडानशिवे, बंडू गवळी, विकी पवार, योगेश सोनवणे, शशी डोलारे आदिसह मातंग समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close