‘एमएएच-एमबीए -सीईटी-२०२१’ करिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु.. ..
स्वेरी मध्ये आँनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध!

छायाचित्र-स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, स्वेरी चिन्ह व एमबीएचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील.
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर– ‘शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘ एमएएच-एमबीए -सीईटी-२०२१’ ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे.’ अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य, मुंबईचे आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी यांनी संकेतस्थळावरुन कळविले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ‘एमबीए’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘एमएएच-एमबीए-सीईटी-२०२१’ ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार खुल्या वर्गासाठी रु. एक हजार तर राखीव वर्गासाठी रु. आठशे अशा शुल्कासह अर्जाची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता मंगळवार, दि. २२ जून २०२१ ते शनिवार, दि. १७ जुलै २०२१ (रात्री-११.५९) पर्यंत कालावधी दिला आहे. सदरील परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या https://mba2021.mahacet.org/StaticPages/HomePage या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थी आणि पालक यांनी नोंद घ्यावी. विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परिक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चूका होत असतात आणि धावपळ ही होत असते. त्या दृष्टीने स्वेरी अभियांत्रिकी च्या एमबीए विभागामध्ये एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क सोबत आणणे आवश्यक आहे. ‘एमएचटी-सीईटी २०२१’ संदर्भात व एमबीए प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात अधिक माहितीसाठी एमबीएचे विभागप्रमुख प्रा. करण पाटील (मोबा.क्र. ९५९५९२११५४) व प्रा. शालन जगताप (मोबा.क्र. ८६९८५३९३०९) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले आहे.


