Uncategorized

रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची वार्षिक सभासद नोंदणी अभियान सभा संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
शहापूर /ठाणे(आशा रणखांबे):-तमाम अधिकारी व कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे शिखर संघटन म्हणजेच रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन होय . ही संघटना विविध सामाजिक कार्यात अग्रणी आहे. शहापूर येथे ठाणे जिल्हा, शहापूर तालुका व मुरबाड तालुका यांच्या वतीने सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमा विषयी संयुक्त सभेचे आयोजन ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख कामगार नेते संजय थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली .
यावेळी सभेस ठाणे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब शिंदे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ सरनोबत , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष भरत चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष शालीग्राम तायडे, ठाणे जिल्हा संघटनक नवनाथ रणखांबे, शहापूर तालुका अध्यक्ष कमलाकर वांगीकर, मुरबाड तालुका अध्यक्ष विलास शिंदे, मुरबाड तालुका प्रसिद्धी प्रमुख विशाल चंदने, राजीव चंदने, शरद रातांबे, आनंद गायकवाड, शिरीष पानपाटील, भीमराव राऊत, मनोहर पवार, आदी मान्यवर उपस्थितीत होते .
ठाणे जिल्हात अधिकाधिक सभासद नोंदणी सुरु करणे , जिल्हयात संघटनेची ताकद वाढवणे, पदोन्नती आरक्षण विषयक भूमिका, गुणवंतांचा सत्कार, इ. विषयावर चर्चा झाली.
शहापूर तालुका अध्यक्ष कमलाकर वंगीकर यांनी शहापूर कार्यकारणी कडून सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिरीष पानपाटील यांनी केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close