Uncategorized

शिवस्वराज्य युवा संघटनेचा राज्यस्तरीय ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे
पंढरपूर (प्रतिनिधी):- शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पंढरीरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा दि.14जुन 2021 रोजी विठ्ठल इन, पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, युवानेते भगिरथ भालके, गादेगाव ग्रामपंचायत सदस्या सीमाताई बागल, नगरसेवक महादेव धोत्रे, समाजसेवक संजयबाबा ननवरे, माजी नगरसेवक किरण घाडगे, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे, युवक काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सागर कदम, देवराज युवा मंचचे अध्यक्ष शहाजी शिंदे उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रजवलन करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व यानंतर सर्व गुणवंतांना पुरस्कार वितरीत करण्यात आले.
यावेळी उत्कृष्ट वारकरी संप्रदाय संत सुधाकर (महाराज) इंगळे सोलापूर, उत्कृष्ट पत्रकार पंढरपुर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे पंढरपूर, समाजसेवक महेश डोंगरे बिंटरगाव, उत्कृष्ट सामाजिक संस्था संतोष माने सांगली, उत्कृष्ट शिक्षिका नंदिनी किसन टेळे- मासाळ (मंगळवेढा ), उत्कृष्ट सायकलिंग सूर्यकांत पवार पुणे , वैद्यकिय समाजसेवा डॉ.सोमनाथ शिंदे पंढरपूर, उत्कृष्ट विधीज्ञ दत्तात्रय पाटील कौठाळी, उत्कृष्ट युवा उद्योजक सोमनाथ शिंदे गादेगाव, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी इकबाल रशीद शेख सोलापूर, उत्कृष्टकलाकार ओम जोजारे पंढरपूर , उत्कृष्ट क्रिकेट समालोचक नितीन वाघमारे पंढरपूर आदी विविध क्षेत्रातील गुणीजनांना यावेळी सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल पुष्पहार, फेटा बांधुन सन्मानीत केले.
आजचा हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे.’’ कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना करण्यात आला.याप्रसंगी सुधाकरमहाराज इंगले, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, युवकनेते भगिरथ भालके, इकबाल रशीद शेख, सूर्यकांत पवार यांनी आपल्या मनोगतात संदीप मुटकुळे आणि शिवस्वराज्य युवा संघटनेच्या कार्याचे कौतुक करत पुरस्कारप्राप्त गुणवंतांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भागवत चवरे महाराज अखिल भाविक वारकरी संप्रदाय मंडळाचे सोलापूर जिल्हा सहजिल्हाअध्यक्ष ज्ञानेश्वर ( माऊली) भगरे मगळवेढा शहर अध्यक्ष होते. गोपाळ कोकरे महाराज उपाध्यक्ष,मल्लिकार्जुन राजमाने महाराज, सदस्य अरविंद माने, समाजसेवक सोपानकाका देशमुख, राष्ट्रवादी युवक चे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवस्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, युवक तालुकाध्यक्ष रोहन नरसाळे, पंढरपूर शहराध्यक्ष किरण शिंदे, शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक सचिव चैतन्य शिंदे, शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक खजिनदार निलेश भुईटे, संघटनेचे सदस्य उमाकांत करंडे, सोहम शिंदे, विशाल शिंदे, कु.श्रध्दा मुटकुळे यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिगंबर भोसले यांनी केले तर आभार शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार साठे यांनी मानले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close