Uncategorized

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त १८ जुनला पंढरपुरात साकारणार ४५ बाय २५ भव्य रांगोळी ;

रांगोळीतून करणार कोरोना यौध्दाविषयी  कृतज्ञता व्यक्त

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ,माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी २२ वर्षापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या प्रादेशिक पक्षाची स्थापना करून एक वृक्ष लावला होता त्याचा आता एक मोठा वटवृक्ष झाला असून नुकताच राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूचना केल्याप्रमाणे हा वर्धापन दिन दि. १० जून ते २० जून असा माणूसकीच्या नात्याने “आरोग्य दिंडी सप्ताह” म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्यावतीने ही महाभव्यदिव्य रांगोळी साकारून यातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आजपर्यंत व कोरोनाच्या काळात वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन व सफाई कामगार यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पंढरपूर शहरात प्रथमच ४५ बाय २५ अशी मोठी रांगोळी साकारण्यात येणार असून त्यामध्ये पंढरपूरचे आराध्यदैवत विठुराया तसेच वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व सफाई कामगार, अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी दिंडी यांच्या चित्रांचा या रांगोळीमध्ये समावेश असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे.
महाराष्ट्राच्या विकासामध्ये आजपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. सध्याच्या कोरोनाच्या काळात ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने आपआपल्या परीने जनतेच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत व पक्षाने दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचे लोक “माझा सांगाती “या आत्मचरित्रामधून प्रशासकीय कामकाजाचे अनेक पैलू त्यामध्ये दिसून येतात. त्यांनी केलेल्या कार्याची ओळख प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी २२ प्रशासकीय अधिकारी यांना हे पुस्तक भेट दिलेले आहे व त्या माध्यमातून प्रशासकीय अनुभवाचा फायदा प्रशासनातील अधिकाऱ्यांना व्हावा हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविलेला आहे. तरी या रांगोळीचे उद्‌घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते दि.१८ जून रोजी सकाळी ११वाजता होणार असून या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी शहर उपाध्यक्ष दादा थिटे, संतोष बंडगर, सुरज पेंडाल, आकाश नेहतराव, तानाजी मोरे, निलेश कोरके, सारंग महामुनी , सुरज कांबळे आदि परिश्रम घेत आहेत.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close