Uncategorized

मायक्रो फायनान्स कंपनीवर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करा

पुरोगामी संघर्ष परिषदेची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

सांगली:-आज दि.१४जून सोमवार पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये मायक्रो फायनान्स कंपन्या भरमसाठ व्याज आकारणी करून हातावर पोट असलेल्या महिलांना दमदाटी करून लॉकडाउनच्या च्या काळातील हप्ते वसूल करणार नाही असे सांगून हप्ते वसूल करत आहेत शिवाय तुमच्या नावापुढे लाल रेष मारून तुमचे सिबिल खराब करीन असे सांगून कर्ज वसुली दमदाटी ने चालू आहे .सदर कंपन्यांचे व्याजदर 20 ते 22 टक्के पेक्षा जास्त पडतात याची शासकीय तपासणी करून सदर कंपनीच्या वर खाजगी सावकारकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा सौ. स्वाती सौंदडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सांगली जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सदर शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नयना लोंढे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय खुडे ,पश्चिम महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सावळा खुडे ,शहर जिल्हाध्यक्षा संगीता साठे, महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा ज्योती गोकाक, सौ रतन लोखंडे, विजय सौंदडे ,वासू गोकाक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close