पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष खंडू कांबळे यांचा घोरपडीत भव्य नागरी सत्कार

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
कवठेमंकाळ :-(घोरपडी) पुरोगामी संघर्ष परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांनी सांगली जिल्हाध्यक्ष पदी खंडू कांबळे यांंची निवड केले बद्दल त्यांचे जन्मगाव असलेले घोरपडी (ता .कवठेमंकाळ) येथील ग्रामस्थांच्यावतीने व राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.(कोरोना चे नियम पाळून) यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे कवठेमहंकाळ तालुकाध्यक्ष संपत नरळे यांच्या हस्ते मानाचा फेटा बांधून भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व स्वागत अविनाश कोकरे यांनी केले. यावेळी नवनाथ डोंबाळे, गजानन पुजारी ,सागर कांबळे ,नितीन कांबळे प्रणित कांबळे, भारत बनसोडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन रवी सावंत यांनी केले तर अजित जाधव व रोहित सावंत यांनी कार्यक्रमाचे व खंडू कांबळे यांचे विशेष आभार मानले.