टेंभुर्णी अमानवी अत्याचार प्रकरणी मातंग समाज समितीच्या वतिने पोलीस अधीक्षक ,जिल्हाधिकारी यांना निवेेदन

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
सोलापूर :-दि २९मे रोजी टेंभुर्णी पोलिसांकडून अमानवी, अत्याचारी पद्धतीने टेंभुर्णी येथील स्थानिक मातंग समाजातील महिलांना व पुरुषांना शिवीगाळ करून धाकदपटशा करून मानवी व प्राण्यांची विष्ठा साफ करायास लावून बेकायदेशीर कृत्य केलेल्या घटनेचा जाहीर निषेध सोलापूर शहर व जिल्हा मातंग समाज समितीच्या वतिने करण्यात आला.
या प्रकरणातील संबंधितावर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी मातंग समाज समिती सोलापूर यांच्या वतीने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.यावेळी युवराज पवार मातंग समाज अध्यक्ष सोलापूर शहराध्यक्ष,
रमेश बोराडे सल्लागार मातंग समाज समिती सोलापूरराजू क्षीरसागर सचिव , लखन गायकवाडसचिव,कार्याध्यक्षखंडू बनसोडे उपाध्यक्षबाळासाहेब तांबे,अनिल बनसोडे,महादेव भोसले,मल्लिकार्जुन कांबळे,कार्यकारणी सदस्य सुर्यकांत केंदळे,
कोषाध्यक्ष हिरा आडगळे,
सहसचिव बंडू गवळी,
प्रभाकर कांबळे आदी उपस्थित होते.


