पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी विठ्ठल महापुरे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
कडेगाव:- मंगळवार पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कडेगाव तालुकाध्यक्षपदी विठ्ठल महापुरे (सासपडे) यांची निवड करण्यात आली आहे.
पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांनी त्यांना निवडीचे नुकतेच पत्र दिले विठ्ठल महापुरे हे सामाजिक कार्यातून पंचक्रोशीतील जनतेची सेवा करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून अन्यायाच्या विरोधात काम करण्याची संधी मिळाली आहे या निवडीनंतर बोलताना विठ्ठल महापुरे म्हणाले राजकारण विरहित समाजकारण हेच समाजाच्या विकासासाठी पूरक ठरेल नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून संघटनेचा विचार व काम समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणेचे प्रामाणिक काम करेन. असेे आश्वासन त्यांनी दिलेे.


