भिमशक्ती सांस्कृतिक मंडळाचे वतिने वही पेन वाटप
डाँ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राबविला उपक्रम

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-भिमशक्ती सांस्कृतिक बहुद्देशीय सामाजिक संस्था व रमामाता महीला मंडळ संतपेठ सांगोला रोड पंढरपूर यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फुले हार नारळ न आणता एक वही व पेन घेऊन विनम्र अभिवादन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या वेळी जे शालेय साहित्य आणुन अभिवादन करण्यासाठी आले ते साहित्य जमा करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन संस्थेचे गौतम विद्यालय येथील विद्यार्थी यांना सिध्दार्थ सरवदे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले,
यावेळी गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक दोडके सर,नंदकुमार वाघमारे सर, विलास जगधने सर सर्व शिक्षक व संस्थापक अध्यक्ष संतोष सर्वगोड, अँड.किशोर खिलारे ,दत्ता चंदनशिवे, लखन लामकाने, लखन सर्वगोड, सिध्दार्थ गावकरे, अमित खिलारे , बापू भोसले, रशिद मुलाणी, ताजुद्दीन सय्यद, आधारस्तंभ राहुलदादा मोरे, सुमित पवार, रविंद्र सर्वगोड, शिवाजी चंदनशिवे, रोहन खरात, सचिन भोरकडे,दिपक बनसोडे, हे उपस्थित होते.