पंढरपूर नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांनी अथवा कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस न घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा — मुख्याधिकारी अरविंद माळी
पंढरपूर शहरातील नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांची लसीकरणा बाबत तपासणी

बातमी पत्र
जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
शासनाने शहरातील प्रत्येक नागरिकांनी अथवा व्यवसायिकांनी लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत असे बंधनकारक केले आहे जर व्यवसायिकांनी मास्कचा वापर केला नाही किंवा लस घेतली नाही तर त्यांच्या आस्थापना बंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत त्यास अनुसरून मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या तपासणी पथकाने
पंढरपूर नगरपरिषद मालकीच्या शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांना भेटी देऊन गाळेधारक व त्या दुकानामध्ये काम करत असलेल्या कामगारांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत का नाही याची तपासणी केली आहे.
तसेच दुकानांमध्ये मास्कचा वापर केला जातो किंवा नाही याची तपासणी या पथकाद्वारे करण्यात आली गाळेधारक अथवा त्यांच्या दुकानात काम करणारा कर्मचारी यांनी लसीकरण करून घेतले नसल्यास त्यांना दुकान उघडता येणार नाही अथवा कामगारास दुकानात काम करता येणार नाही अशी सक्त ताकीद देण्यात आली व तसे आढळल्यास त्यांच्यावर रक्कम रुपये पाच हजार दंडात्मक कारवाई करण्यात येईल अथवा आस्थापना म्हणजे दुकाने बंद करण्यात येतील अशा सक्त सूचना देण्यात आल्या.
ज्या ठिकाणी मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या गाळेधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली ही कारवाई मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी पथक प्रमुख चेतन चव्हाण, रवींद्र नगरे, महाकाल नलवडे, मधुकर क्षीरसागर यांनी केली तरी शहरातील सर्व नागरिकांनी व व्यवसायिक यांनी लसीकरणाची दोन्ही डोस घ्यावेत असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.