Uncategorized

राज्यात कोरोना रूग्णांना सर्वच खाजगी रुग्णालयात  मोफत उपचार करावेत :अमोल लांडगे

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे

आटपाडी:- दिवसे दिवस आपल्या राज्यात कोरोनाचा कहर सुरू आहे हातावरील पोटे उपाशी आहेत गोरगरिबांना जगणे अवघड झाले आहे. अशा परीस्थिती मध्ये जर कोरोना झाला तर पैसे कोठून आणावेत हा गंभीर प्रश्न त्यांचे समोर निर्माण होत आहे. म्हणून राज्य तील सर्व खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार करावेत अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेचे प.महाराष्ट्र अध्यक्ष अमोल लांडगे यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असतो यामुळे कोरोना रूग्णांना खाजगी रुग्णालयाकडे गेल्या शिवाय पर्याय नसतो. तर खाजगी रुग्णालयाकडून धडकी भरणारी बिले आकारली जात आहेत आधीच…. लाकडाऊन …असल्याने प्रचंड आर्थिक कोंडी झाली असुन त्यात रुग्णालयांची भरमसाठ बिले भरतांना नाकीनऊ येत आहे .आंध्र प्रदेश सरकारने नुकताच कोरोना रूग्णांना सरकारी व खाजगी दवाखान्यात मोफत वैद्यकीय उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याच धर्तीवर आपण सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात हा निर्णय घेवून जनतेला दिलासा द्यावा व त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे त्यांनी आवहान केले आहे.तसेच सरकारी रुग्णालयात योग्य त्या सर्व सुविधा दिल्या तर रुग्णांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा.अशी मागणी अमोल लांडगे यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close