Uncategorized

 गरजू कुटुंबांना पुरोगामी संघर्ष परिषदेने केली मदत

स्वतः वर्गणी काढून केले अन्नधान्याचे वाटप

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल

श्रीकांत कसबे
मिरज:-दिनांक १७ वार सोमवार. लॉकडाऊनच्या काळात रोजगार बंद, हाताला काम नाही ,रोजंदारीवर पोटपाणी चालणाऱ्यांच खाणंच बंद होऊ लागलं. याचा गांभीर्याने विचार करून पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी यांनी स्वतः वर्गणी गोळा करून मिरज येथील समतानगर मध्ये दहा कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. अन्यायाच्या विरोधात लढता लढता कोरोना महामारी पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर रचनात्मक पद्धतीने मैदानात उतरून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन एक आदर्श घालून दिला.
या कार्यात पुरोगामी संघर्ष परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुभाष वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी संघर्ष परिषदेचे सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष खंडू कांबळे ,पश्चिमहाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्षा सौ. उषा सौंदडे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता साठे, मिरज तालुका अध्यक्षा सौ.रतन लोखंडे ,महापालिका क्षेत्राच्या अध्यक्षा सौ ज्योती गोकाक, कुपवाड शहर अध्यक्षा सौ शुभांगी साळुंखे,मिरज तालुकाकार्याध्यक्ष मा.सचिन साठे, अनिता गोकाक पुरोगामी संघर्ष परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. सावळा खुडे(आण्णा) इत्यादी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन पुढील कुटुंबाला मदत केली.
सुनंदा आवळे, पल्लवी कांबळे संगीता चांदणे, सुशीला चौरीनाथ ईमा कांबळे, प्रतीक्षा घोरपडे .शेवटी आभार जिल्हा कार्यकारणी सदस्या सौ. अश्विनी कांबळे यांनी मानले.फोटो ओळ पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने अन्न  धान्याचे किट वाटप करत असताना जिल्हा उपाध्यक्ष खंडू कांबळे, सावळा खुडे ,उषा सौंदडे ,ज्योती गोकाक इत्यादी.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close