मायक्रो फायनान्सचे हप्ता वसुलीच्या तगाद्याने महिलेने घेतले पेटवून
प्रशासनाला आत्ता तरी येणार का जाग पुरोगामी संघर्ष परिषदेने विचारला सवाल

जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
कराड:-येवती(ता.कराड)येथील मनिषा मनोज सोनवणे या महिलेने मायक्रोफायनान्स ग्रामीण कट्टा या अधिकाऱ्यांच्या हप्ता वसुलीच्या तगाद्याने जाळून घेतल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरोगामी संघर्ष परिषदेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी हाकलून लावले होते. लॉक डाऊन च्या काळात माणसं जगायला धडपडत आहेत .या परिस्थितीत हप्ता मागायला येऊ नका .तरीसुद्धा मायक्रो फायनान्स अधिकारी सही च्या नावाखाली हप्ता मागायला येत होते .याचा मनात धसका घेऊन मनीषा सोनवणे या महिलेने पेटवून घेतल्याचा पुरावा वसूलीला आलेल्या अधिकाऱ्याच्या समोरच पुरोगामी संघर्ष परिषदेचे तालुका अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी दिला. यानंतर सदर अधिकाऱ्याने उद्दामपणा ची भाषा वापरली जाळून घेतलेल्या साठी आमच्या कडे विमा नसतो.
पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने सांगली जिल्ह्यामध्ये मायक्रोफायनान्सचे हप्ता वसूली ताबडतोब थांबवा असा इशारा दिला होता. सांगली पाठोपाठ साताऱ्यामध्ये ही इशारा देऊन सुद्धा या अधिकाऱ्यांना वारंवार परत पाठवून सुद्धा सदर अधिकारी सह्यांच्या नावाखाली हप्ते मागायला येऊन महिलांना धाक दाखवत आहेत. याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषद पालकमंत्र्यांना घेराव घातल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष कृष्णात चव्हाण, कराड तालुका अध्यक्ष, शंकर चव्हाण, पुरोगामी संघर्ष परिषदेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर साठे , अधिक चव्हाण ,प्रकाश सातपुते इत्यादी पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.याचा शासन प्रशासन यांनी गांभीर्याने विचार करावा.अन्यथा होणाऱ्या परिणामाला शासन आणि प्रशासन जबाबदार असेल असे ही आवहान करण्यात आहे.