पंढरीत आजपासुन ” शिवपुत्र संभाजी”या ऐतिहासिक महानाट्यास सुरुवात
डी.व्ही.पी.ग्रुपचे सर्वेसर्वा अभिजीत(आबा) पाटील यांनी दिली माहिती

जोशाबा टाईम्स वेब न्यूज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपुर:-पंढरपुरातील ऐतिहासिक भुमीत शिवजयंती निमीत्त महानाट्य करण्याचे नियोजन होते अँडव्हांस देऊन तयारी केली होती परंतु कोरोना महामारी मुळे अडचणी निर्माण झाल्या. आता परस्थीती व्यवस्थित झालेने संभाजीराजे यांचे जयंती चे औचित्य साधुन शिवपुत्र संभाजी ” या महानाट्य दिंनाक ५ मे ते ९ मे हे पाच दिवस संध्याकाळी ६:३०ते १० यावेळेत सलग पाच दिवस रसिकांना दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे .अशी माहीती संयोजक डी.व्ही.पी.ग्रुपचे सर्वे सर्वा अभिजीत( आबा)पाटील यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले की,महेद्र महाडिक यांनी या महानाट्याची निर्मिती केली असुन अभिनेते व खासदार डाँ.अमोल कोल्हे हे संभाजीराजांची भुमिका करणार असुन एकुण २५०कलावंताचा यामध्ये सहभाग असुन पंढरपुर परिसरातील अनेक कलावंताना संधी मिळाली आहे.
डी.व्हीपी.माँल व थियेटर समोर चंद्रभागा ग्राऊण्ड वर या कार्यक्रमाचे नियोजन केले असून सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.
नेटके नियोजश करता यावे यासाठी पासेसचे सोय केली असून पंधरा हजार फँमीली व दहा हजार व्यक्तीगत लोकानां प्रवेश देण्यात येणार असून ज्या तारखेचा पास त्याच तारखेस चालणार असून एकच नाटक पाच दिवस रिपिट होणार असल्याने सर्व रसिकांनी या नाटकाचा आनंद घ्यावा व ईतीहास जाणुन घ्यावा असे आवहान अभिजीत (आबा) पाटील यांनी केले आहे.
्