Uncategorized

पंढरपूर दुमदुमले संभाजी महानाट्याने…..

दिमाखदार उद्घाटन सोहळा

जोशाबा टाईम्स वेब न्यूज़ पोर्टल

श्रीकांत कसबे

प्रतिनिधी/- कोरोनानंतर प्रथमच पंढरपूर येथे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचे छत्रपती संभाजी महाराज महानाट्याच्या स्वरूपात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर नगरीत करण्यात आले त्याचे उदघाटन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.

या कार्यक्रमाला अनेक जेष्ठ श्रेष्ठ नेते, सन्माननीय व्यक्तिमत्वे आणि पंढरपूरातील शिवप्रेमींनी प्रचंड प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला आहे.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमदार बबनदादा शिंदे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘ एवढ्या मोठ्या स्वरूपात झालेला हा कार्यक्रम पंढरपूरात होणे ही आनंदाची गोष्ट आहे. पंढरपूरच्या इतिहासात प्रथमच अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून आभाळाएवढा महासांस्कृतिक सोहळा पार पडलेला आहे. अभिजीत पाटील यांच्याकडून सुरू असलेल्या कार्याला शुभेच्छा.’

आमदार शहाजी बापू पाटील आपल्या भाषणात म्हणाले. ‘सोलापूर जिल्ह्यात मोठ्या धडाडीने काम करत असलेले अभिजीत पाटील यांनी आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे हे दिसून येते. कार्यक्रमाला बोलावून अभिजीत पाटलांनी मला वयाच्या ६५ व्या वर्षी पगडी घालून तयार व्हायला प्रेरित केले. या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो.’

कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व लोक छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व समोर बघून भारावून गेलेले दिसत होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात अभिजीत पाटलांनी एक नवी सांस्कृतिक भर घातली अशी सोलापूर जिल्ह्यात आता चर्चा सुरू झाली आहे. अभिजीत पाटील जे करतात ते इतरांपेक्षा वेगळे असते आणि भव्य असते या मताला या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिकांमधून दुजोरा मिळत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close