संपुर्ण देशाची आरोग्य यंञणांच व्हेंटीलेटर वर – बंडू घोडे सर
केंद्र सरकारने वेळीच पायबंद घातला असता तर हि वेळ आली नसती
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर:- आजची देशातील कोरोनाची भयाण अवस्था कदाचित टाळता आली असती.
जर कोरोनाची चाहुल लागुन ही मोदीजीनी ट्रम्पचा कार्यक्रम देशात घेतला नसता.किंवा त्याहीनंतर परदेशातुन येणा-या प्रवाश्यांना ज्या- त्या विमान तळावरच रोकुन त्यांची तातपुरती निवास व भोजनासह अरोग्याची व्यवस्था करून एक महिना त्यांना क्वारंटाईन केले असते किंवा त्याही नंतर त्यांची त्यांच्या घरी जिल्हा ,तालुका ,नगर-महानगर यंञणा मार्फत कडक निगराणी खाली पोलीसांच्या मदतीने नजर ठेवून गंभीरपणे घेवून नजर ठेवली असती किंवा रूग्ण संख्या असलेल्या विभागाला ,गावाला ,शहराला, तालुक्याला,जिल्ह्याला आवश्यक त्या कालावधी साठी लाँकडाउन केले असते तर आज हाजारोंचे जिव गेले नसते.
अनेकांचे घर,संसार उध्वस्त झाले नसते,लोक बेघर,बेरोजगार,लाचार,मजबुर हतबल,निराधार ,अनाथ,होण्याची ही वेळ आलीच नसती कदाचित…याचा परिणाम म्हणुनच आज संपूर्ण आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे.असे परखड मत बंडू बी घोडे सर संस्थापक अध्यक्ष पुरोगामी विचार मंच यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केले.
पत्रकात पुढे ते म्हणतात की, आज रूग्ण व्हेंटीलेटर बेड किंवा आयसीयू बेड,साधाही बेड मिळत नसल्या कारणाने कोणी दवाखान्याच्या पायरीवर तर कोणी गाडीतच,तर कोणी झाडाखाली आपला प्राण सोडत आहेत ,नातेवाईक हतबल ,मजबुर झाले आहेत,रूग्ण वाढीचा व मृत्यूचा आकडा दिवसेंगणिस वाढत्या उन्हाच्या तापमाना बरोबर वाढतच आहे.
कोणी आपला कर्ता कमविता कुटूंबप्रमुख तर कोणी बाप-आई,बहीण-भाऊ,आजी-आजोबा,प्रिय-सखा-सोबती,पती-पत्नी ,मुलगा-मुलगी, सुन,जावई, ईत्यादी आपल्या काळजाचा तुकडा गमवित आहेत.
अगदी काळीज पिळवटून टाकणा-या घटना रोज घडोघडीला घडत आहेत,वाढत आहेत.अनेकांनी आपले सगे-सोयरे गमावले आहेत पण त्याही पलिकडचं दु:ख म्हणजे या आपल्या प्रियजनांच्या दुख:त व्यकतीश: अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांनाही सहभागी होता आले नाही व आज ही सहभागी होता येत नाही,जाताही येत नाही. अनेकांच्या कुटूंबात तर एका पेक्षा अनेक प्रिय व्यक्ती त्यांना सोडून गेल्या आहेत त्यांचे दुख हे न पहावणारे आहे.
या सर्व परिस्थितीत राज्यसरकार व यंञणा हतबल झाली आहे,
आज अनेकांना (oxygen)प्राण वायू मिळणे कठीणच नव्हे तर अशक्य होत आहे , रूग्ण माशासारखे तडफडून आपल्या आप्तस्विकिंया समोरच प्राण सोडत आहेत.
संपुर्ण देशाचा वर्तमानच आज संकटात आहे.
आज घडीला संपुर्ण अरोग्य यञंणा आपुरी पडत आहे अरोग्य यंञणांच आज व्हेंटीलेटर वर आहे असे नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
आज कित्येक लोकांचा रोजगार जात आहे,उद्योग-धंदे बंद पडत आहेत,अनेकांवर बेरोजगारीचे व उपासमारीचे संकट आले आहे.
राज्यात व देशात रेमडेसिवीर ईंजेक्शनचा व लसीचा तुटवडा येत आहे,पण ईतर देशांना लस पुरवली जात आहे.
तरीही केंद्र सरकार राजकारणाचे डावपेच करणे सोडून राज्याला आवश्यक ती मदत करत नाहीत म्हणून सर्वोच्च न्यायालयाला नाराज होवून तासेरे ओढण्याची वेळ येते,पण राजकारणा शिवाय यांचे पानही हालत नाही हेच यातुन दिसते.लो कांच्या प्राणापेक्षा यांना राजकारण व सत्ता खुर्ची महत्वाची वाटते, म्हणूनच संकट काळी ही लोकांसाठी निंर्बंध पण राजकारणासाठी लाखोंच्या प्रचार रँली,व जाहीर सभेस परवानगी मिळत आहे,व लोक ही स्वत:चा जीव धोक्यात घालुन यांच्या भूलथापाना बळी पडून सभेला गर्दी करत आहेत व स्वत:च त्याची किमंत मोजत आहेत,याची राजकारण्या ना कसली काळजी ना कसली दया …
या भावनिक लोकांच्या गर्दीवर ते आपली राजकिय पोळी भाजत आहेत. कधी बदलेल भारतिय राजकारणांची मानशिकता..?
कधी हे राजकारणी, त्यांना मत दानाच्या स्वरूपात दान करून सत्तेवर बसवणा-या,विविध कर भरून तिजोरी भरणा-या भारतीय (नागरिकांच्या) लोकांच्या सुरक्षेला अरोग्याला,व शिक्षणाला सर्वोच्च प्रधान्य देवून आपली जबाबदारी पार पाडतील?
कधी लोकांच्या साठी सोयी सुविधा पुर्णपणे पुरवतील.?
का असेच मेलेल्या प्रेताच्या (मढ्याच्या)टाळू वरचं लोणी खाणारी वृती अशीच जोपासत पुढे नेतील व असेच निर्ल्लजपणे त्यांचे समर्थक समर्थन करतील.
सुप्रिम कोर्टाच्या ताशेरेचा काही फायदा होईल का? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळच देईल.अशी भुमिका पत्रकाच्या शेवटी व्यक्त केली आहे.
आमचेकडे सेंद्रिय केसर आंबा ठोक व किरकोळ योग्य दरात विक्री केली जाते.
संपर्क साधा-जि.के .गायकवाड, प्रतिभाताई परिचारकनगर
टाकळी रोड पंढरपूर मो.नं.8668839290