जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
इस्लामपुुुर:-आज भारत देशामध्ये कोरोनाविषाणू ने जो हाहाकार माजविला आहे आणि त्याच्यापुढे सगळेच विभाग मग तो आरोग्य विभाग असो किंवा अन्नपुरवठा विभाग असो हतबल झालेले दिसून येत आहे अशा या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये जनतेला सावरण्यासाठी सक्रीय योगदान महत्त्वाचे मानून पुरोगामी संघर्ष परिषदेचे कार्यकर्ते राज्यभर जनतेला दिलासा देण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून सामाजिक बांधिलकी जपून सक्रिय भूमिका बजावणार असल्याचे *पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक* *अध्यक्ष प्रा .सुभाष वायदंडे* यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
प्रा.वायदंडे यानी प्रसिद्धीपत्रकात बोलताना पुढे म्हणाले रोजंदारीवर बारा बलुतेदार समाजातील संख्या जास्त असून शेतमालाला दर नसल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाही त्यांचेवर उपासमारीची वेळ आल्यामुळे तसेच बांधकाम मजूर यांचीसुद्धा परिस्थिती वेगळी नाही याच्यापेक्षा बँड, बॅन्जो हे कलाकार सुद्धा बारा बलुतेदार मधीलच आहेत यांच्यासाठी निधी गोळा करणे ,अन्नधान्य गोळा करणे, व वितरित करणे ही जबाबदारी कोरोना योद्धा म्हणून पुरोगामी संघर्ष परिषद यशस्वीपणे पार पडेल त्यासाठी राज्यभरातील कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे प्रा सुभाष वायदंडे यांनी शेवटी म्हटले आहे.