पंढरपूर शहरातील नागरिंकासाठी कोवीड१९ची लस,आँक्सिजन, व रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध करून द्यावेत
नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांची पालकमंत्र्याकडे मागणी
जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
(श्रीकांत कसबे)
पंढरपूर :-येथे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे यांनी बैैैठक आयोजित केली होती या यावेळी नगराध्यक्ष च्या वतीने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले पक्षनेते गुरुदास अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके यांनी पालकमंत्र्यांना निवेदन दिले. सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पंढरपूर शहरातील नागरीकांची कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा (कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटल, दवाखाने) अपुरी पडत असुन त्यांच्यावर खुप ताण पडत आहे. यामध्ये ऑक्सिजन, रेमडीसिवीर इंजेक्शन हे देखील अपुरे पडत आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवुन मृत्युची प्रमाण वाढले आहे. पंढरपूर शहरातील नागरीकांना होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व नियंत्रित होण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना रेमडीसिवीर व ऑक्सिजनचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा.
तसेच पंढरपूर शहराची लोकसंख्या 1 लाख असुन शासनाकडुन सात दिवसातुन फक्त 200 ते 300 कोव्हिड 19 च्या लसीचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होवुन नागरीकांना लस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. व दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी शहराची लोकसंख्या विचारात घेता व नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीमुळे वाढलेली रुग्णांची संख्या विचारात घेता दररोज 2000 कोव्हिडची लस नगरपरिषदेला मिळावी जेणेकरुन नागरीकांना लसीकरण करुन रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणता येईल अशी मागणी नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले यांनी केली आहे.
—––———————————————-
आमचेकडे सेंद्रिय केसर आंबा ठोक व किरकोळ योग्य दरात विक्री केली जाते.
संपर्क साधा-जि.के.गायकवाड, प्रतिभाताई परिचारक नगर
टाकळी रोड पंढरपूर मो.नं.8668839290