जोशाबा टाईम्स वेब न्युज पोर्टल
श्रीकांत कसबे
पंढरपूर-कोरोना बरा करणारे व ९१.१५%प्रभावी ठरणारे औषध “झायडस कँडीला”ला डीसीआयसीने मंजुरी दिली असल्याची माहिती डॉ. तात्यासाहेब लहाणे यांनी दिली. या औषधाच्या दोन चाचण्या झाल्या असुन तिसऱ्या टप्पयाचे निष्कर्ष लवकरच बाहेर येतील.औषध बनविणाऱ्या कंपनीने सात दिवसात कोरोना बरा होतो असा दावा केला असुन सर्व वयातील रुग्णांसाठी प्रभावी ठरणार आहे.केंद्र सरकार त्याची किंमत ठरवून सर्व तांत्रिक बाबी पुर्ण करुन हे औषध लवकरच उपलब्ध होईल असे डॉ लहाने यांनी सांगितले.
रेमडेसिवीर बाबत बोलताना ते म्हणाले की या औषधांचा दोन ते नऊ दिवसच फक्त सहाच इंजेक्शन चा वापर केला पाहिजे तरच उपयोग होतो. पण दहा,बारा, चौदा दिवसानंतर रेमडेसिवीर चा काहीच उपयोग होत नसतानाही वापर होतो.त्यामुळे या इंजेक्शन चा तुटवडा होतो व गरजुला उपलब्ध होण्यास अडचणी येतात .असे ही डॉ तात्यासाहेब लहाने म्हणाले.