भैरवनाथ वाडी,नारायण चिंचोलीत कर्मयोगी स्व.सुधाकरपंत परिचारक यांना विधायक उपक्रमातुन अभिवादन
सुपंत वृक्षारोपण आणि हरिभजनाने श्रद्धेय नेत्याला आदरांजली अर्पण


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर :-राज्याच्या राजकारणात एक संततुत्य आणि जनमानसात अढळ स्थान असलेले नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, स्वर्गीय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्थांचा उदय व विकास झाला, हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि शेतकर्यांच्या जीवनात मोठा कायापालट झाला. याच लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथ वाडी आणि नारायण चिंचोली येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यस्मरणानिमित्त भैरवनाथ वाडी येथे सर्वप्रथम हरिभजनाचे आयोजन करण्यात आले होते. भजनाच्या पवित्र वातावरणात उपस्थितांनी आपल्या लाडक्या नेत्याला स्मरण केले. पुष्पवृष्टी व प्रतिमेचे पूजन: पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते श्रद्धेय कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून उपस्थितांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. सुपंत वृक्षारोपण: पर्यावरणाचा संदेश देत आणि कर्मयोगींच्या विचारांची जोपासना करत, भैरवनाथ भजनी मंडळ, अण्णा हजारे आणि तात्यासाहेब देशमुख यांच्या हस्ते परिसरात ‘सुपंत वृक्षारोपण’ करण्यात आले. नारायण चिंचोली येथील वीर भगतसिंग सार्वजनिक वाचनालय येथेही स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाच्या वतीने नेत्याच्या स्मृतींना उजाळा देत आदरांजली वाहण्यात आली. खाऊ वाटप: या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधत, नारायण चिंचोली येथे प्रसाद वाटप करण्यात आले. समाजोपयोगी आणि विधायक उपक्रमांतून नेत्याचे स्मरण करणे हा यामागचा मुख्य उद्देश होता.

यावेळी लक्ष्मणराव तात्या धनवडे, लक्ष्मण तात्या कोल्हे माजी सरपंच, गहिनीनाथ चव्हाण उपसरपंच, विष्णुपंत माने माजी चेअरमन, ज्ञानेश्वर बरडे चेअरमन, दत्तात्रेय मस्के सर अध्यक्ष सूर्यनारायण मंदिर समिती, पोपट पाटील माजी सरपंच, विजय कोळेकर, बळवंत धनवडे माजी सरपंच, हरिभाऊ माने, बापूराव कोले, लहू दादा नलवडे, दादा सोनवर, पांडुरंग घाडगे, दादा मामा डुबल, अण्णा हजारे, दादा जानकर, श्रीधर कोळेकर, बापू कोळेकर, मुकुंद घाडगे, दत्ता बनसोडे, सचिन भडकवाड, दीपक गुंड, विनोद कोळेकर, शिवाजी भोसले, सचिन घाडगे, ज्ञानेश्वर वाघमोडे, पांडुरंग पांढरे, डॉक्टर आनंद गाजरे, डॉक्टर महादेव सरडे, भाऊसाहेब माने, सिद्धेश्वर सुरवसे, रमेश कोले, आप्पा महाडिक, नारायण गुंड, भास्कर भोसले, सचिन गुंडगे, अनिल देशमुख, बापू वसेकर, तुकाराम कोळी, महेश आप्पा माने, अण्णा बरडे , नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी भजनी मंडळ बाळू वसेकर, कल्याण मामा डबल, हनुमंत घाडगे, विनय सरवदे यांच्यासह भैरवनाथ वाडी नारायण चिंचोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



