Uncategorized

कुशल जैन सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे सीईओ

सीईओ कुलदीप जंगम यांची बदली

जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल

श्रीकांत कसबे

पंढरपूर :-सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आले असून त्यांच्या जागेवर गडचिरोली येथील प्रांत अधिकारी कुशाल जैन यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

कुलदीप जंगम यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरती पारदर्शकपणे राबवून एक प्रकारे त्यांनी जिल्हा परिषदेचा नावलौकिक केला. शांत आणि रिस्पेक्ट फुल अधिकारी म्हणून कुलदीप जंगम यांची सोलापुरात ओळख निर्माण झाली होती.

दरम्यान त्यांच्या जागेवर कुशाल जैन हे येणार आहेत. जैन हे २०२२ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC CSE 2021) संपूर्ण भारतात ४० वा क्रमांक (AIR 40) पटकावला होता.ते मध्यप्रदेशातील जबलपूर येथील मूळ रहिवासी आहेत

.शिक्षण: त्यांनी माहिती तंत्रज्ञान (Information Technology) विषयात अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली आहे. आयएएस होण्यापूर्वी त्यांनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या नामांकित कंपनीत काम केले होते.

सध्याचे पद: सध्या ते गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी (Assistant Collector) आणि ITDP-अहेरीचे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

कॅडर: त्यांना सुरुवातीला आंध्र प्रदेश कॅडर मिळाले होते, परंतु नंतर त्यांची बदली महाराष्ट्र कॅडरमध्ये झाली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close