डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अभिराज उबाळे तर स्वागताध्यक्षपदी परवेज मुजावर


जोशाबा टाइम्स वेब न्यूज पोर्टल
– श्रीकांत कसबे
पंढरपूर :- विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार अभिराज उबाळे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर स्वागत अध्यक्षपदी परवेज मुजावर , उपाध्यक्षपदी विशाल भैया मांदळे , कार्याध्यक्षपदी महेश मोटे , सचिव पदी कृष्णा सर्वगोड , कोषाध्यक्षपदी योगेश जाधव, सहसचिव पदी अजिंक्य होवाळ, प्रसिद्धीप्रमुख पदी सुरज साखरे, रुपेश वाघमारे , सह कोषाध्यक्षपदी स्वप्निल कांबळे तर कार्यकारणी सदस्य म्हणून संजय सातपुते आणि राहुल भोरकडे यांची नियुक्ती करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 जयंती पंढरपूर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि 25 भीम जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे मावळते अध्यक्ष शैलेश आगावणे होते.
या बैठकीला आर पी आय चे नेते जितेंद्र बनसोडे ,आरपीआयचे तालुकाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक डी राज सर्वगोड, चेअरमन संतोष सर्वगोड, रिपब्लिकन सेनेचे सागर गायकवाड, उमेश सर्वगोड, आरपीआयचे शहराध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड, बहुजन हितकारणी सभेचे रवी सर्वगोड, योगेश जाधव, अमित कसबे, अनिल ननवरे , विशाल मांदळे, अजिंक्य होवाळ, कनिष्क सर्वगोड, सतीश सर्वगोड यांच्यासह शहरातील 25 मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भीम जयंती उत्सव काळामध्ये विविध सामाजिक ,सांस्कृतिक, शैक्षणिक, बौद्धिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच चित्र रंगभरण स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी अध्यक्ष अभिराज उबाळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये पंचशील ध्वज उभारण्याबाबत नगरपालिकेला निवेदन देण्यात आले. यामध्ये 9 एप्रिल पूर्वी सदरचा धम्म ध्वज उभारण्यात यावा अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे आणि मुख्याधिकारी महेश रोकडे यांना देण्यात आले.



